दाभोली-हळदणकरवाडी येथील श्री देवी भवानीच्या नूतन मूर्तीचा पुन:प्रतिष्ठापना सोहळा

दाभोली-हळदणकरवाडी येथील श्री देवी भवानीच्या नूतन मूर्तीचा पुन:प्रतिष्ठापना सोहळा

*कोंकण एक्सप्रेस*

*दाभोली-हळदणकरवाडी येथील श्री देवी भवानीच्या नूतन मूर्तीचा पुन:प्रतिष्ठापना सोहळा*

*वेंगुर्ला प्रतिनिधी*

दाभोली-हळदणकरवाडी येथील श्री देवी भवानीच्या नूतन मूर्तीचा पुन:प्रतिष्ठापना सोहळा 22 ते 24 एप्रिल या कालावधीत संपन्न होणार आहे. दि.22 रोजी सकाळी 10 वा. नूतन मूर्तीचे सिमेवरून गौतमे·श्वर नारायण मंदिरात प्रदक्षिणा घालून भवानी मंदिरात आगमन, दुपारी महाप्रसाद, रात्रौ 9 वा. ह.प.भ.अवधूत नाईक यांचे सुश्राव्य कीर्तन, त्यानंतर भजन, दि. 23 रोजी सकाळ धार्मिक विधी, दुपारी महाप्रसाद, रात्रौ भजन-कीर्तन, दि.24 रोजी सकाळी धार्मिक विधी, सकाळी 9.10 मिनिटांच्या शुभमुहूर्तावर श्री भवानी देवीच्या नूतन मूर्तीची प्रतिष्ठापना, तत्व न्यास, तत्व होम, प्रतिष्ठांग होम, श्री सत्यअंबा पूजा, बलिदान, पूर्णाहूती, कुमारीका पूजन, महानैवेद्य, महाआरती, महाप्रसाद, सायं. 4 वा. हळदीकुंकू, सायं.7 वा. दीपोत्सव, रात्रौ 8 वा. भजन, रात्रौ 9.30 वा. गौतमे·श्वर दशावतारी नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी या कार्यक्रमांना उपस्थित रहावे असे आवाहन श्री देवी भवानी मंदिर व हळदणकर परिवारातर्फे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!