‘आरंभ – नव्या उद्योगाचा’ या तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन

‘आरंभ – नव्या उद्योगाचा’ या तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन

*कोंकण एक्सप्रेस*

*‘आरंभ – नव्या उद्योगाचा’ या तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन*

*कणकवली : प्रतिनिधि*

छोट्या व्यावसायिकांना व नव्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘आरंभ – नव्या उद्योगाचा’ या तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव दिनांक 17 ते 19 एप्रिल 2026 दरम्यान लक्ष्मी विष्णू मंगल कार्यालय, कॉलेज रोड, कणकवली येथे सकाळी 11 ते रात्री 9 या वेळेत पार पडणार आहे.
या प्रदर्शनाचे उद्घाटन कणकवली नगराध्यक्ष मा. संदेशजी पारकर यांच्या शुभहस्ते शुक्रवार, दिनांक 17 एप्रिल रोजी होणार आहे.
या प्रदर्शनामध्ये लघुउद्योग व गृहउद्योग करणाऱ्या व्यावसायिकांना विशेष प्राधान्य देण्यात आले असून, हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे, अशी माहिती संयोजक मोनाली वर्दम व कृतिका कोरगावकर यांनी दिली.
या प्रदर्शनाचे हे पहिलेच वर्ष असून कणकवली शहरात प्रथमच अशा प्रकारचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे. जिल्हाभरातून विविध प्रकारचे स्टॉल्स उत्स्फूर्त प्रतिसाद देत सहभागी होत आहेत.
गृहसजावटीच्या वस्तू, हस्तकला, मसाले, दागिने, कपडे, कोकणी मेवा, बॅग्स, टी-शर्ट्स तसेच घरगुती खाद्यपदार्थ यांचा समावेश असणार आहे.
यावर्षीच्या प्रदर्शनाचे खास आकर्षण म्हणजे लकी ड्रॉ! दररोज एका भाग्यवान विजेत्याला आकर्षक गिफ्ट देण्यात येणार आहे.
या महोत्सवाच्या माध्यमातून लहानांपासून ते प्रौढांपर्यंत सर्वांना एकाच ठिकाणी खरेदीचा आनंद घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!