*कोंकण एक्सप्रेस*
*क्रिकेट स्पर्धेतून देशाला खेळाडू मिळतील*
*संदेश पारकर : शिरवल येथे क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन*
*कणकवली ः संजना हळदिवे*
शिरवल गावात संदीप चौकेकर मित्रमंडळ व प्रवीण मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गावात क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेतून देशाला खेळाडू मिळतील, असा विश्वास नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी व्यक्त केला.
शिरवल गावामधील संदीप चौककर मित्रमंडळ व प्रवीण तांबे मित्रमंडळ, शिरवल आयोजित केलेल्या एक गाव एक संघ ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते झाले. यावेळी शिरवल सरपंच गौरी वंजारे, उपसरपंच प्रवीण तांबे, डॉ. दिलीप घाडी, बबली राणे, शिरवल सोसायटीचे व्हाईस चेअरमन भाई कोदे, पत्रकार तुळशीदास कुडतरकर, माजी सरपंच मनोज राणे, ग्रामपंचायत सदस्य सुचित गुरव, दत्ताराम तांबे, मंदार तांबे, गुरुप्रसाद वंजारे, सुनिल तांबे, अनिल कुडतरकर आदी उपस्थित होते.
श्री. पारकर यांनी संदीप चौकेकर आणि प्रवीण तांबे मित्र मंडळाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. भविष्यात या मित्रमंडळाने आपली उत्तरोत्तर प्रगती करावी आणि पुढच्या क्रिकेट स्पर्धा या प्रकाश झोतात घ्यावात. कणकवलीत बाजारपेठ मित्र मंडळाच्या माध्यमातून मोठ्या स्पर्धा घेतल्या .त्यावेळी हजारांच्या संख्येने क्रिकेटप्रेमींचा जनसमुदाय उपस्थित असायता. तशाच पद्धतीने या स्पर्धा भविष्यात व्हाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
क्रिकेट स्पर्धेत साठी प्रथम पारितोषिक १ लाख रु. आकर्षक चषक द्वितीय ५१ हजार रु. आकर्षक चषक, तृतीय १५,००० रु. आकर्षक चषक उत्कृष्ट फलंदाज २,५०० रु. आकर्षक चषक, गोलंदाज २,५०० रु. आकर्षक चषक, मालिकावीर ५००० रु. आकर्षक चषक, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक २,५०० आकर्षक चषक अशी बक्षिसे आहेत.

