आशिये गावचा सर्वांगिण विकासासाठी कटीबध्द – दिलीप तळेकर

आशिये गावचा सर्वांगिण विकासासाठी कटीबध्द – दिलीप तळेकर

*कोंकण एक्सप्रेस*

*आशिये गावचा सर्वांगिण विकासासाठी कटीबध्द – दिलीप तळेकर*

*आशिये मुख्य रस्ता ते खालचीवाडी रस्त्याचे नुतनीकरण , मजबूतीकरण या कामाचा शुभारंभ*

*कणकवली ः संजना हळदिवे*

आशिये गाव हा कायम खा. नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठीशी राहिलेला आहे. त्यामुळे या गावाच्या विकासाची जबाबदारी आम्हा सर्वांची आहे. गावातील रस्त्यांसोबत पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी आम्हा सर्वांचे प्रयत्न आहेत. त्यामुळे कणकवली शहरालगत असलेल्या या आशिये गावचा सर्वांगिण विकासासाठी कटीबध्द असल्याचे प्रतिपादन भाजपा मंडल अध्यक्ष दिलीप तळेकर यांनी केले.

आशिये मुख्य रस्ता ते खालचीवाडी रस्त्याचे नुतनीकरण , मजबूतीकरण या कामाचा शुभारंभ भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला . यावेळी जि.प.सदस्या सुप्रिया मेस्त्री , उपसभापती सोनु सावंत , सरपंच महेश गुरव , उपसरपंच संदीप जाधव , बुथ अध्यक्ष सचिन गुरव , सुहास गुरव, अमोल गुरव, भास्कर पुजारे, भिवा गुरव, धोंडी माणगावकर, दीपक गावडे, श्रीधर गुरव, बाळकृष्ण गुरव, लवु पुजारे, निधी पुजारे, समीर गुरव, मनोहर नाईक, रामचंद्र मेस्त्री, सुनील पुजारे, मयुर पांचाळ, रुपेश माणगावकर, प्रमोद पांचाळ, रुचिता माणगावकर, सुजन पुजारे, मयुर गुरव, श्रेयस पुजारे, निलेश पांचाळ, महादेव गुरव, प्रसाद गुरव, जयश्री गुरव,दशरथ गुरव , ग्रामसेवक राकेश गोवळकर , मयुर पांचाळ, प्रमोद पांचाळ आदी उपस्थित होते.

जि.प.सदस्या सुप्रिया मेस्त्री म्हणाल्या, आशिये गावातील ग्रामस्थ जिल्हा परिषद निवडणूकीत आपल्या पाठीशी राहिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे सर्वतोपरी प्रयत्न असणार आहेत.

उपसभापती सोनु सावंत म्हणाले , आशिये गावाच्या विकासात पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यामातून मोठा निधी विविध कामासाठी आलेला आहे. आशिये मुख्य रस्ता ते खालचीवाडी जाणा-या रस्त्यामुळे नागरिकांना सुविधा निर्माण होणार आहेत. या गावचे सरपंच महेश गुरव निष्ठा व प्रामाणिकपणे गावाची सेवा करत आहेत.

सरपंच महेश गुरव म्हणाले , आशिये गावासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून सर्वांगिण विकास साधला जात आहे. पुढील वर्षभरात गावातील राहिलेली कामे मार्गी लावली जातील. आशिये मुख्य रस्ता ते खालचीवाडी जाणा-या रसत्यासाठी खा. नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून 50 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच हे काम पूर्णत्वास जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!