*कोंकण एक्सप्रेस*
*सावंतवाडीत टाटा मॅजिक-आयशरची समोरासमोर धडक; दशावतार कलाकार जखमी*
*भाईसाहेब सावंत समाधीस्थळाजवळ अपघात; चालकासह प्रवाशांना दुखापत, मोठी दुर्घटना टळली*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
येथील माजगाव परिसरातील माजी मंत्री भाईसाहेब सावंत यांच्या समाधीस्थळाजवळ टाटा मॅजिक व आयशर वाहनामध्ये समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. सुदैवाने या घटनेत मोठी जीवितहानी टळली असून चालकासह गाडीत असलेले दशावतार कलाकार जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दशावतार नाट्यप्रयोगासाठी कलाकार टाटा मॅजिक वाहनातून प्रवास करत होते. दरम्यान, समोरून येणाऱ्या आयशर वाहनाला धडक बसल्याने हा अपघात घडला. अपघातात टाटा मॅजिकचा चालक जखमी झाला असून इतर कलाकारांना किरकोळ दुखापत झाली आहे. घटनेनंतर जखमींना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. या अपघातामुळे परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

