पडेलमध्ये उबाठाला खिंडार,नामदार नितेश राणे यांच्या हस्ते उबाठा कार्यकर्त्यांच्या भाजपामध्ये प्रवेश

पडेलमध्ये उबाठाला खिंडार,नामदार नितेश राणे यांच्या हस्ते उबाठा कार्यकर्त्यांच्या भाजपामध्ये प्रवेश

*कोंकण एक्सप्रेस*

*पडेलमध्ये उबाठाला खिंडार,नामदार नितेश राणे यांच्या हस्ते उबाठा कार्यकर्त्यांच्या भाजपामध्ये प्रवेश*

*नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश*

*पडेल ग्रामपंचायतीचे दोन सदस्यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी केला प्रवेश*

*देवगड ः प्रतिनिधी*

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त पडेलमध्ये उबाठा पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या हस्ते उबाठा पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

या प्रवेशामध्ये सौ. प्रतिक्षा प्रभाकर माळगवे, श्री. सिद्धेश्वर मनोहर पाटणकर (ग्रामपंचायत सदस्य, पडेल), श्री. तानसेन पायाजी पडेलकर (संचालक, पडेल विकास सोसायटी), श्री. चंद्रशेखर विजय सुतार (शहरप्रमुख, पडेल), श्री. राजेंद्र बळीराम परब (संपर्क व प्रचारप्रमुख, पडेल) तसेच श्री. प्रभाकर शांताराम माळगवे यांचा समावेश आहे.

राणे साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पडेल येथील उबाठा पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात भाजपाची ताकद वाढल्याचे मानले जात आहे.

हा प्रवेश सोहळा ओरोस येथील पत्रकार भवनात पार पडला. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार अजित गोगटे देवगड मंडल तालुकाध्यक्ष राजा भुजबळ बंड्या नारकर, पडेल सरपंच भूषण पोकळे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!