*कोंकण एक्सप्रेस*
*हनुमान जन्मोत्सवानिमित्त 1501 सूर्यनमस्कार*
*वेंगुर्ला प्रतिनिधी*
हनुमान जन्मोत्सवाचे औचित्य साधून वि·ा हिंदू परिषद बजरंग दल वेंगुर्लातर्फे 1501 सूर्यनमस्कार घालण्यात आले. हा कार्यक्रम माणिकचौक येथे पार पडला.
यावेळी बजरंग दल जिल्हा संयोजक कृष्णाजी धुळपणावर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळू देसाई, रोहन धूरी, नित्यानंद आठलेकर, आशिष पाडगांवकर यांच्यासह बजरंग दलाचे कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन ऋग्वेद आरोलकर तर आभार मयुरेश पेडणेकर यांनी मानले.

