*कोंकण एक्सप्रेस*
*शिरवलमध्ये १५ एप्रिलपासून क्रिकेट स्पर्धा*
*संदीप चौकेकर व प्रवीण तांबे मित्रमंडळातर्फे आयोजन*
*कणकवली ः संजना हळदिवे*
संदीप चौकेकर मित्रमंडळ व प्रवीण तांबे मित्रमंडळ, शिरवल यांच्या संयुक्त विद्यमाने १५ ते १९ एप्रिल या कालावधीत शिरवल येथे एक गाव एक संघ स्वरुपाची ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेकरिता अनुक्रमे १ लाख रु. व चषक, ५१ हजार रु. व चषक, १५ हजार रु. व चषक, १५ हजार रु. व चषक अशी बक्षिसे आहेत. याशिवाय उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षकसाठी प्रत्येक २ हजार ५०० रुपये व चषक व मालिकावीरसाठी ५ हजार रु. व चषक अशी वैयक्तिक स्वरुपातील बक्षिसे आहेत. या स्पर्धेत प्रथम नाव नोंदणी करणाºया १६ संघांना प्रवेश दिला जाणार असून ८ एप्रिलपर्यंत इच्छुक संघनोंदणी करणे अनिवार्य आहे. ही स्पर्धा लीग पद्धतीची असून ४ गटांमध्ये खेळवली जाणार आहे. प्रत्येक गटांमधूनन विजयी झालेला संघ सेमीफायनल साठी प्राप्त ठरणार आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी प्रवीण तांबे, संदेश तांबे, अविनाश कदम, अनिप सावंत यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

