क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंती निमित्त ; ‘समाज जागृती मंच, दोडामार्ग’ संस्थेकडून घोषणा

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंती निमित्त ; ‘समाज जागृती मंच, दोडामार्ग’ संस्थेकडून घोषणा

*कोंकण एक्सप्रेस*

*क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंती निमित्त ; ‘समाज जागृती मंच, दोडामार्ग’ संस्थेकडून घोषणा*

*दोडामार्ग – शुभम गवस*

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १९९ व्या जयंती निमित्त, ‘समाज जागृती मंच, दोडामार्ग’ यांच्या वतीने दोडामार्ग तालुक्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा विशेष गौरव केला जाणार आहे. पत्रकारीता क्षेत्रातुन दैनिक तरुण भारत संवादचे दोडामार्ग प्रतिनिधी तेजस तुकाराम देसाई यांचा सन्मान होईल.
नुकतीच याबाबत कार्यकारणीची विशेष बैठक संपन्न झाली आणि विविध क्षेत्रातील सन्मानपात्र नावे जाहीर करण्यात आली. यावेळी अध्यक्ष दिपक बुधाजी जाधव, सचिव संतोष सगुण कदम, खजिनदार महेश मोहन जाधव, उपाध्यक्ष गोविंद केशव कदम, सहसचिव शंकर शांताराम जाधव, सदस्य भगवान महादेव जाधव, मंगेश प्रकाश जाधव, उषाकिरण क्रांतीराज सम्राट, जेनिफर मार्शल लोबो, कैतान अंतोन डिसोजा, विजय गुणाजी कांबळे आदी उपस्थित होते. दिनांक ११.०४.२०२६ रोजी सकाळी ९:०० वाजता दोडामार्ग न्यू इंग्लिश स्कूल, दोडामार्ग येथे हा सन्मान सोहळा पार पडणार आहे. तेजस देसाई हे गेली १२ हुन अधिक वर्षे पत्रकारीता क्षेत्रात आहेत. सामाजिक भान असणारी लेखणी म्हणून त्यांची ओळख आहे. ग्रामीण भागाची नाळ जपत विविध विषयावर लिखाण करत सामाजिक पत्रकारीतेमुळे त्यांनी अनेक कुटुंबाना आधार दिला आहे.
विविध क्षेत्रातील सन्मानपात्र नावे अशी आहेत,
1. ऍड समीर शंकर जाधव (खुप कष्टातून शिक्षण घेतले कोणताही बॅकग्राऊंड नाही)
2. ऍड महेंद्र मोहन जाधव(खुप कष्ट घेऊन वकिली पदवीधर प्राप्त)
3. तेजस देसाई (अभ्यासू पत्रकार )
4. प्रथमेश प्रदीप नाईक (नवोदित पत्रकार)
5. कॅलीस मार्शल लोबो दहावी इंग्रजी माध्यम 93% मार्क्स
6. जनार्दन खानोलकर ग्रामपंचायत अधिकारी आदर्श ग्रामसेवक
7. परशुराम लक्ष्मण जाधव (साहस स्वतः च्या आई ला वाघाचा जबडा फाडून सोडवलं )
8. फादर जॉन (वयाच्या 80 व्या वर्षी पण तीच ऊर्जा घेऊन सिंधुदुर्ग जिल्यात 3 व रत्नागिरी जिल्ह्यात 2 निःस्वार्थ पणे वृद्धाश्रम चालवतात)
9. उत्कर्ष कृषी पर्यटन महिला समूह सासोली (सामूहिक शेती तसेच कुक्कटपालन इतर व्यवसाय सामूहिक करतात)
10. रमाई बचत महिला समूह मणेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!