सिंधुदुर्ग जिल्ह्यात महसूल वसुलीचा विक्रम; ‘ब’ पत्रक १००% पूर्ण, ‘अ’ पत्रकातही उच्चांक

सिंधुदुर्ग जिल्ह्यात महसूल वसुलीचा विक्रम; ‘ब’ पत्रक १००% पूर्ण, ‘अ’ पत्रकातही उच्चांक

*कोंकण एक्सप्रेस*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यात महसूल वसुलीचा विक्रम; ‘ब’ पत्रक १००% पूर्ण, ‘अ’ पत्रकातही उच्चांक*

*सिंधुदुर्गनगरी*

सिंधुदुर्ग जिल्ह्यात महसूल वसुलीत उल्लेखनीय यश मिळवत प्रशासनाने विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. जिल्ह्यातील ‘ब’ पत्रकाची वसुली १०० टक्के पूर्ण करत उद्दिष्टपूर्ती साधण्यात आली असून ‘अ’ पत्रकातही गेल्या पाच वर्षांतील उच्चांक गाठण्यात आला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सूक्ष्म नियोजन करून सदरची कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

जिल्ह्यातील ०८५३ या लेखाशिर्षांतर्गत ‘ब’ पत्रकासाठी शासनाकडून ७० कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी महसूल विभागाने प्रभावी नियोजन करत आतापर्यंत ७०.४२ कोटी रुपयांची वसुली केली आहे. त्यामुळे ‘ब’ पत्रकाचे उद्दिष्ट १०० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहे.

तसेच ००२९ जमीन महसूल या लेखाशिर्षांतर्गत ‘अ’ पत्रकाचे उद्दिष्ट पूर्ण करताना जिल्ह्याने गेल्या पाच वर्षांतील सर्वोच्च वसुली साध्य केली आहे. यामध्ये सुमारे ११.३६ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या काटेकोर, अचूक आणि सूक्ष्म नियोजनामुळे ही यशस्वी कामगिरी साध्य झाली आहे.

विशेष म्हणजे, मा.उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल झाल्यामुळे जिल्ह्यात वाळू लिलाव प्रक्रिया यावर्षी राबविण्यात आलेली नाही. त्यामुळे त्या माध्यमातून अपेक्षित महसूल वसुली होऊ शकली नाही. तसेच शासनाकडून अतिरिक्त कर माफी करण्यात आली असतानाही महसूल विभागाने विक्रमी वसुली करत आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!