*कोंकण एक्सप्रेस*
*हायवेवर वाळू भरून थांबणाऱ्या डंपर/ट्रक वर कारवाई करण्याची मनसेची मागणी*
*कणकवली ः संजना हळदिवे*
जांभूळवाडी ते कासार्डे या NH66 हायवे परिसरात मोठ्या प्रमाणात वाळू रस्त्यावर सांडलेली दिसून येते. ही वाळू प्रामुख्याने डंपर/ट्रक वाहतुकीदरम्यान खाली पडत असून सदर समस्येमुळे दुचाकी व चारचाकी वाहन घसरून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
अचानक ब्रेक लावताना वाहनांवर नियंत्रण सुटून जीवितहानीचा धोका निर्माण होत आहे तसेच
रस्त्यावर धूळ उडून नागरिकांना श्वसनाचे त्रास होत आहेत व हायवेची सुरक्षितता व दर्जा कमी होत आहे.वाहतुकीमध्ये अडथळे निर्माण होत असून प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.संबंधित डंपर/ट्रक चालक व कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्यात यावी,
पुढील काळात वाळू सांडू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी व नियम कडकपणे अंमलात आणावेत.व तात्काळ लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग यांच्याकडे करण्यात आली
यावेळी मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिकेत तर्फे कणकवली तालुका अध्यक्ष शांताराम सादये समिर तेली सुनील सोनार देवेंद्र जाधव पदाधिकारी उपस्थित होते

