*कोंकण एक्सप्रेस*
*नवीन कुर्ली येथे बांधकाम कामगारांसाठी मोफत आरोग्य शिबिर संपन्न*
*नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाकडून आयोजन*
*कणकवली ः संजना हळदिवे*
नवीन कुर्ली येथे ग्रामविकास मंडळाच्या प्रयत्नातून बांधकाम कामगार बंधू भगिनींसाठी आज मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी नवीन कुर्ली आणि आजूबाजूच्या इतर गावातील सुमारे ९० लाभार्थ्यांनी लाभ घेतला. या कार्यक्रमाला डॉ. रुचिरा सावंत, साक्षी महाडिक (मॅनेजर), आशिष परब, चैतन्या तारकर व श्री चंद्रकांत शिंदे सामाजिक कार्यकर्ते यांचे विशेष सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कोलते,सचिव धिरज हूंबे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमित दळवी, कृष्णा परब, सखाराम हूंबे, दत्ताराम साळसकर, शिवाजी चव्हाण आदि ग्रामस्थ उपस्थित होते.

