सुशांत दळवी कुटुंबियांचे मा.आ. वैभव नाईक, परशुराम उपरकर यांनी केले सांत्वन

सुशांत दळवी कुटुंबियांचे मा.आ. वैभव नाईक, परशुराम उपरकर यांनी केले सांत्वन

*कोंकण एक्सप्रेस*

*सुशांत दळवी कुटुंबियांचे मा.आ. वैभव नाईक, परशुराम उपरकर यांनी केले सांत्वन*

*कणकवली ः संजना हळदिवे*

कणकवली येथील बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांच्या डोक्यात बंदुकीची गोळी घालून त्यांचा निर्घृणरित्या खून करण्यात आला आहे. त्यामुळे दळवी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून आज माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी सुशांत दळवी यांच्या कणकवली येथील निवासस्थानी भेट देऊन दळवी कुटुंबियांचे सांत्वन केले.
या खून प्रकरणात जे कोणी आरोपी असतील त्या सर्व आरोपींना अटक होऊन त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी आणि सुशांत दळवी यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही आवाज उठवीत आहोत. दळवी कुटूंबियांच्या पाठीशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष उभा असल्याचे सांगत वैभव नाईक,परशुराम उपरकर यांनी कुटुंबियांना धीर दिला. यावेळी सचिन सावंत,रुपेश आमडोस्कर,अरविंद दळवी सर, नंदू परब,लक्ष्मण दळवी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!