*कोंकण एक्सप्रेस*
*वेंगुल्र्यात धर्मविर बलिदान मासाचे पालन*
*वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव)*
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना त्या क्रूर वृत्तीच्या औरंग्याने 40 दिवस यवन यातना देऊन छळ करीत मारले. त्याप्रित्यर्थ श्रीशिवप्रतिष्ठानचे धारकरी आणि सह्राद्री प्रतिष्ठानचे दुर्गसेवक शिवतपस्वी गुरूवर्य श्री संभाजीराव भिडे गुरूजी यांच्या मार्गदर्शनाखाली फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्यापर्यंत धर्मवीर बलिदान मास पाळत आहे. 18 मार्च रोजी या बलिदान मासाची सांगता होणार आहे.
यामध्ये वेंगुर्ला माणिकचौक येथे श्रावणी गोकाककर, निधी परब, मानस परब, ओजस परब, गोविंद कोळी, साहिल राऊळ, यशराज कोयंडे, धारकरी प्रज्वल कोयंडे, प्रियांका कोयंडे, मठ-कावलेवाडी येथे धारकरी तेजसराव देसाई, साहिल परब, शुभम परब, परेश धुरी, शक्ती चौगुले तर वेतोरे-आडेली येथे पंकज राऊळ, विशाल येरम, मिलिंद बोवलेकर, आदिनाथ धर्णे हे नि:स्वार्थपणे धर्मविर बलिदान मास पाळत आहेत. हे सर्वजण एक महिना पायात चप्पल न घालणे, चहा, गोड पदार्थ न खाणे, शुभ प्रसंग टाळणे
असे नियम पाळत आहेत. तसेच दररोज संध्याकाळी 7 वाजता मठ-कावलेवाडी, वेतोरे-आडेली आणि माणिकचौक येथे शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर दिपप्रज्वलीत करून श्री संभाजीह्मदय श्लोक, ध्येय प्रेरणा मंत्र म्हटले जात आहेत. उर्वरित मुलांनी प्रेरणा घेऊन धर्मविर बलिदान मास पाळवा असे आवाहन या मुलांनी केले आहे.

