गरूडझेप’ महोत्सवाचे आयोजन

गरूडझेप’ महोत्सवाचे आयोजन

*कोंकण एक्सप्रेस*

*गरूडझेप’ महोत्सवाचे आयोजन*

*वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव)*

राऊळवाडा येथील जबरदस्त सांस्कृतिक कला-क्रीडा मंडळातर्फे 21 ते 23 मार्च या कालावधीत ‘गरूडझेप’ महोत्सवाचे आयोजन केले आहे. यावर्षी विविध स्पर्धांसोबत ‘शिमगोत्सव’ स्पर्धा हे खास आकर्षण रहाणार आहे.

या महोत्सवांतर्गत शनिवार दि.21 मार्च रोजी सकाळी 9 वा. मीना पार्क येथे रक्तदान शिबिर होणार आहे. याच्या अधिक माहितीसाठी कौशल मुळीक (9421101943), बापू वेंगुर्लेकर (9673216889), हर्षद रेडकर (8805233522), नील नांदोडकर (9307101757) यांच्याकडे संपर्क साधावा. याच दिवशी सायं.7 वा. नायरा पेट्रोलपंपानजिक जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धा होणार आहे. यातील प्रथम तीन क्रमाकांना 8 हजार, 5 हजार, 3 हजार आणि आकर्षक चषक देण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी 500 रूपये प्रवेश फी ठेवण्यात आली असून स्पर्धक संघांनी आपली नावनोंदणी स्वप्निल पालकर (8482835393), रसिक वेंगुर्लेकर (7057996447), अनिकेत वेंगुर्लेकर (9172633769), सागर शिरसाठ (7776970737) यांच्याकडे करावी.

रविवार दि. 22 मार्च रोजी सकाळी 10 वा. वेंगुर्ला शाळा नं.4 येथे जिल्हास्तरीय चित्रकला व रंगभरण स्पर्धा आयोजित केली असून यासाठी पहिली ते दुसरीसाठी रंगभरण, तिसरी ते चौथीसाठी ‘कुंडीतील फुलझाड’, आठवी ते दहावीसाठी ‘सार्वजनिक विहिर’ आदी विषय ठेवण्यात आले आहेत. स्पर्धकांनी आापली नावनोंदणी चंदन रेडकर (8180878143), विवेक राऊळ (9764148152), शैलेश काणेकर (8766681334), निखिल नाईक (7558308341) यांच्याकडे करावी. याचदिवशी सायं.5 वा. नायरा पेट्रोलपंपानजिक पाककला स्पर्धा (विषय-मोड आलेले कडधान्य) होणार आहे. स्पर्धकांनी मंगेश परब (8149617209), रोहित रेडकर (9404749596), यतीन गांंवकर (7507377806), मयूर रेडकर (7517813839) यांच्याकडे नावनोंदणी करावी. रात्रौ 8 वा. चिमणी पाखर डान्स अॅकॅडमी कुडाळ यांचा ‘जलवा 2026’ सोबतच ‘वेंगुर्ला क्वीन 2026’ होणार आहे. यातील प्रथम तीन क्रमांकांना 5 हजार, 3 हजार, 2 हजार आणि आकर्षक चषक देण्यात येतील. ‘वेंगुर्ला क्वीन 2026’यात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी आपली नावनोंदणी बापू वेंगुर्लेकर (9604262733), ज्ञाने·श्वर रेडकर (7057278727), अनंत रेडकर (9673126535), लोकेश शिरसाट (9970252806) यांच्याकडे करावी.

सोमवार दि. 23 मार्च रोजी सायं. 7 वा. नायरा पेट्रोलपंपानजिक सत्कार समारंभ, त्यानंतर रात्रौ 8 वा. वेंगुर्ल्यामध्ये प्रथमच शिगमोत्सव स्पर्धा आयोजित केली आहे. यातील प्रथम तीन विजेत्यांना 15 हजार, 10 हजार, 5 हजार आणि आकर्षक चषक देण्यात येणार आहे. या स्पर्धेची नावनोंदणी गौरव राऊळ (7888200911), जयेश राऊळ (9673507944), दिनेश पाटील (7219482777), तुषार भाटकर (8482808052) यांच्याकडे करावी.

गरूड झेप महोत्सवानिमित्त रिल्स स्पर्धेचे आयोजन केले आहे. गरूड झेप महोत्सवातील कार्यक्रमांवर क्रिएटिव्ह रिल तयार करणे हा विषय ठेवण्यात आला आहे. यातील प्रथम आणि द्वितीय क्रमांकास अनुक्रमे 3 हजार, 2 हजार तसेच आकर्षक चषक देण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी दिनेश पाटील (7219482777), अनंत रेडकर (9673126535) किंवा आर्यन शिरसाट (8177905060) यांच्याशी संपर्क साधावा.

सर्व स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, तसेच कार्यक्रमांना उपस्थित रहावे असे आवाहन आयोजक जबरदस्त सांस्कृतिक कला-क्रीडा मंडळातर्फे केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!