भव्य स्वागतयात्रेचे आयोजन

भव्य स्वागतयात्रेचे आयोजन

*कोंकण एक्सप्रेस*

*भव्य स्वागतयात्रेचे आयोजन*

*वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव)*

हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी हिंदूधर्माभिमानी वेंगुर्लातर्फे गुरूवार दि.19 मार्च रोजी भव्य स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्वागतयात्रा सायं. 5 वा. रामे·श्वर मंदिर येथून सुरू होऊन शिरोडा नाका, दाभोली नाका, बाजारपेठ, गाडीअड्डा, मारुती मंदिरमार्गे पुन्हा रामे·श्वर मंदिर येथे त्याची सांगता होणार आहे. तरी या स्वागतयात्रेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. दरम्यान, याच दिवशी दुपारी 3 वा. रामे·श्वर मंदिरात वेशभूषा स्पर्धेचे होणार आहे. दोन गटांत होणाऱ्या या स्पर्धेसाठी इयत्ता 1ली ते 5वीच्या गटाला ‘भारतीय इतिहास व संत परंपरेतील आदर्श व प्रेरणादायी व्यक्तिरेखा’ तर इयत्ता 6वी ते 10वीसाठी ‘रामायण व महाभारतातील आदर्श व प्रेरणादायी व्यक्तिरेखा’ आदी विषय ठेवण्यात आले आहेत. यातील 1ली ते 5वी गटातील विजेत्यांना मिलिंद पिंजाणी यांनी पुरस्कृत केलेली अनुक्रमे 1500, 1000, 750 आणि 500 ची दोन अशी रोख बक्षिसे तर 6वी ते 10वी गटातील विजेत्यांना नगरसेवक गौरी मराठे यांनी पुरस्कृत केलेली अनुक्रमे 2000, 1500, 1000 आणि 500 ची दोन अशी रोख बक्षिसे तसेच दोन्ही गटातील विजेत्यांना अभिषेक वेंगुर्लेकर पुरस्कृत चषक देण्यात येतील. स्पर्धकांनी डॉ.सचिन परूळकर (9421238053) किंवा विनीत परब (8530915304) यांच्याकडे नावनोंदणी करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!