संविधानाच्या ७५ व्या वर्षानिमित्त दोडामार्गात उद्देशिका कोरीव दगडावर बसवण्याची मागणी

संविधानाच्या ७५ व्या वर्षानिमित्त दोडामार्गात उद्देशिका कोरीव दगडावर बसवण्याची मागणी

*कोंकण एक्सप्रेस*

*संविधानाच्या ७५ व्या वर्षानिमित्त दोडामार्गात उद्देशिका कोरीव दगडावर बसवण्याची मागणी..*

*दोडामार्ग : शुभम गवस*

भारतीय संविधानाच्या गौरवशाली ७५ व्या वर्षानिमित्त १४ एप्रिल २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी दोडामार्ग चौकात भारतीय संविधानाची उद्देशिका (Preamble) कोरीव दगडावर कायमस्वरूपी बसवण्यात यावी, अशी मागणी समाज जागृती मंच, दोडामार्गच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात तहसीलदार तसेच मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. दोडामार्ग येथील तहसील कार्यालयासमोर तसेच तालुक्यातील प्रमुख शासकीय कार्यालये आणि मुख्य चौकांमध्येही संविधानाची उद्देशिका बसवण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
संविधानातील मूल्यांबाबत नागरिकांमध्ये जागर निर्माण व्हावा आणि लोकशाहीची जाणीव दृढ व्हावी, हा या मागणीमागील प्रमुख उद्देश असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
हे निवेदन समाज जागृती मंच, दोडामार्गचे अध्यक्ष दीपक जाधव, सचिव संतोष कदम आणि उपाध्यक्ष गोविंद कदम यांनी सादर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!