वक्तृत्व स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटची बाजी; स्वरांजली दळवी जिल्ह्यात प्रथम

वक्तृत्व स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटची बाजी; स्वरांजली दळवी जिल्ह्यात प्रथम

*कोंकण एक्सप्रेस*

*वक्तृत्व स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाटची बाजी; स्वरांजली दळवी जिल्ह्यात प्रथम*

*फोंडाघाट ः संजना हळदिवे*

न्यू इंग्लिश स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज फोंडाघाट येथील इयत्ता ११ वी (विज्ञान) शाखेची विद्यार्थिनी स्वरांजली किशोर दळवी हिने आपल्या लक्षवेधी वक्तृत्वाने जिल्हा स्तरावर प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. माध्यमिक विद्यालय बिडवाडी (ता. कणकवली) येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत स्वरांजलीने प्रथम क्रमांक पटकावून सुवर्ण यश संपादन केले. या दैदिप्यमान यशाबद्दल स्वरांजलीला मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. तिने आपल्या प्रभावी मांडणीने आणि विषयावरील पकडीने उपस्थितांची मने जिंकली.

या यशात तिला मार्गदर्शकांचे, प्रशालेतील शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संतोष जोईल, आर्या भोगले, समाधान वाघमोडे, वृषाली पवार आणि तुषार नेवरेकर यांनी तिला स्पर्धेसाठी विशेष तयारी करून घेतली होती. शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनामुळेच स्वरांजलीने जिल्हा स्तरावर हे यश खेचून आणले, अशा भावना व्यक्त होत आहेत.

संस्था पदाधिकारी व संचालक सदस्य व प्रशालेकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक पी. के. पारकर, पर्यवेक्षक श्री. राठोड, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्वरांजली आणि तिच्या मार्गदर्शक शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!