देवगड पं. स. सभापतीपदी गणेश राणें

देवगड पं. स. सभापतीपदी गणेश राणें

*कोंकण एक्सप्रेस*

*देवगड पं. स. सभापतीपदी गणेश राणें*

*उपसभापतीपदी शिवसेनेचे अमोल लोके*

*देवगड : प्रतिनिधी*

देवगड पं. स. च्या सभापतीपदासाठी भाजपा चे गणेश राणे तर उपसभापती शिंदे शिवसेनेचे अमोल लोके यांची निवड महायुतीच्या पक्षश्रेष्ठींकडून करण्यात आली आहे. देवगड पं. स. सभापतीपदाचा मान पडेल भाजपा मंडला ला मिळाला आहे. गणेश राणे यांनी सभापती पदासाठी आणि अमोल लोके यांनी उपसभापती पदासाठी नामनिर्देशन निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार रमेश पवार यांच्याकडे दाखल केले. यावेळी भाजपा आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. गणेश राणे आणि अमोल लोके यांची बिनविरोध निवड होणार असून दुपारी साडेतीन वाजता अर्ज छाननी नंतर अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!