फोंडाघाट वि.का.स. सोसायटीची महत्त्वपूर्ण मागणी

फोंडाघाट वि.का.स. सोसायटीची महत्त्वपूर्ण मागणी

*कोंकण एक्सप्रेस*

*फोंडाघाट वि.का.स. सोसायटीची महत्त्वपूर्ण मागणी!*

*ई-पीक पाहणीतील तांत्रिक गोंधळामुळे शेतकरी अडचणीत; ‘त्या’ चुकीचा फटका बसल्याने मुदतवाढीसाठी नितेश राणे यांना साकडे!*

*फोंडाघाट ः संजना हळदिवे*

डिजिटल क्रॉप सर्व्हे (ई-पीक पाहणी) मोबाईल ॲपमधील तांत्रिक त्रुटींमुळे शेतकरी हवालदिल झाले असून, या प्रश्नी फोंडाघाट वि.का.स. सेवा सोसायटीने राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री ना. नितेशजी राणे यांना निवेदन देऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
​नेमकी अडचण काय?
​जमाबंदी आयुक्त, पुणे यांच्या आदेशानुसार ई-पीक पाहणी करताना शेतकरी संबंधित गटाच्या २० मीटर परिघात असणे अनिवार्य आहे. मात्र, भूमी अभिलेख कार्यालयाकडील Geo-referencing (अक्षांश-रेखांश) चुकीचे असल्यामुळे, शेतकरी प्रत्यक्ष स्वतःच्या शेतात उभा असतानाही ॲपमध्ये हे अंतर ३ ते ४ किलोमीटर लांब दाखवत आहे. यामुळे पिकांचे फोटो काढता येत नाहीत आणि पर्यायाने पीक नोंदणी होत नाहीये.
​शेतकऱ्यांचे मोठे नुकसान:
​शासकीय भात खरेदी: ई-पीक नोंदणी नसल्याने अनेक शेतकरी शासकीय दरात भात विक्री करण्यापासून वंचित राहिले आहेत.
​पीक विमा: फळपीक विमा योजनेचा लाभ घेतानाही या तांत्रिक चुकीमुळे अडथळे येत आहेत.
​मुदत संपली: भात विक्री नोंदणीची मुदत ३१/०९/२०२६ रोजी संपली असून, तांत्रिक कारणास्तव नोंदणी न झालेल्या शेतकऱ्यांसाठी ही मुदत वाढवून मिळणे आवश्यक आहे.
​”भूमी अभिलेख कार्यालयाच्या तांत्रिक चुकीचा नाहक त्रास शेतकऱ्यांना होत आहे. प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन ‘जिओ-फेन्सिंग’ मधील त्रुटी दूर कराव्यात आणि भात विक्री नोंदणीसाठी मुदतवाढ द्यावी.”
— चेअरमन, फोंडाघाट वि.का.स. सेवा सोसायटी लि.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!