*कोंकण एक्सप्रेस*
*कणकवली पंचायत समिती: ‘राणे’ समर्थकांकडे सत्तेची धुरा!
हर्षदा वाळके सभापती, तर सोनू सावंत उपसभापती पदी विराजमान*
*कणकवली ः संजना हळदिवे*
कणकवली पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीचा बिगुल वाजला असून, भारतीय जनता पक्षाने आपली ‘फिल्डिंग’ लावली आहे. १६ पैकी १६ सदस्य महायुतीचे असल्याने ही निवड केवळ औपचारिकता उरली असून बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
सभापती पद: नांदगाव मतदारसंघातील बिनविरोध विजयी सदस्या हर्षदा वाळके यांची वर्णी लागली आहे.
उपसभापती पद: वरवडे मतदारसंघातील सदस्य राजेश उर्फ सोनू सावंत यांची निवड निश्चित झाली आहे.

