केंद्र शासनाच्या युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयांतर्गत अस्मिता लीग दि. ८ मार्च २०२६ रोजी सकाळी ८.३० जिल्हा क्रीडा संकुल समिती, सिंधुदुर्गनगरी येथे आयोजन*

केंद्र शासनाच्या युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयांतर्गत अस्मिता लीग दि. ८ मार्च २०२६ रोजी सकाळी ८.३० जिल्हा क्रीडा संकुल समिती, सिंधुदुर्गनगरी येथे आयोजन*

*कोंकण एक्सप्रेस*

*जागतिक महिला दिवस – २०२६*

*केंद्र शासनाच्या युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयांतर्गत अस्मिता लीग दि. ८ मार्च २०२६ रोजी सकाळी ८.३० जिल्हा क्रीडा संकुल समिती, सिंधुदुर्गनगरी येथे आयोजन*

*सिंधुदुर्गनगरी*

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून केंद्र शासनाच्या युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयांतर्गत अस्मिता लीग दि. ८ मार्च २०२६ रोजी सकाळी ८.३० जिल्हा क्रीडा संकुल समिती, सिंधुदुर्गनगरी येथे आयोजन करण्यात आले होते. हा उपक्रम माय भारत, सिंधुदुर्ग, जिल्हा क्रीडा विभाग, सिंधुदुर्ग व स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने जागतिक महिला दिन राबविण्यात आले आहे.
महिलांचा क्रीडाक्षेत्रातील सहभाग वाढविणे, शारीरिक तंदुरुस्तीबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच ग्रामीण, शहरी आणि अर्धशहरी भागातील मुली व महिलांना क्रीडामध्ये संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या कार्यक्रमाची प्रस्तावना मा. श्रीम. नीलिमा अडसूळ, जिल्हा क्रीडा अधिकारी, सिंधुदुर्ग यांनी केले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्रीमती नयोमी साटम, अप्पर पोलिस अधीक्षक, सिंधुदुर्ग, मा. श्रीमती आरती देसाई, उपजिल्हाधिकारी, भूसंपादन, सिंधुदुर्ग, श्रीमती नीलिमा अडसूळ, जिल्हा क्रीडा अधिकारी, सिंधुदुर्ग आणि श्रीमती अपेक्षा मांजरेकर, माय भारत, सिंधुदुर्ग या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.
उद्घाटनप्रसंगी उपस्थित मा. नयोमी साटम मॅडम यांनी स्पर्धेत हार जीत महत्वाची नसते हरलो तरी पुढे उठून चालायचे असते. असे आपल्या भाषणात सांगितले. मा. आरती देसाई मॅडम यांनी महिला दीन का साजर केला जातो व तो 8 मार्च रोजीच का साजरा केला जातो याचे महत्त्व पटवून दिले व महिलांना क्रीडा क्षेत्रात पुढे येण्यासाठी प्रोत्साहन दिले तसेच नियमित व्यायाम आणि धावण्याचे आरोग्यासाठी असलेले महत्त्व सांगितले.


स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व महिलांनी उत्साहाने धाव घेत कार्यक्रम यशस्वी केला. शेवटी विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते मेडल व प्रमाणपत्र तसेच सहभागी झालेल्या खेळाडूना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ॲथलेटिक असोसिएशनचे सचिव कल्पना तेंडुलकर, खेलो इंडिया सेंटर प्रशिक्षक अलिस्का आल्मेडा, बाळकृष्ण कदम, हितेश माळणकर यांनी सहकार्य केलं.
स्पर्धेत विजेते खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे –
१०० मीटर धावण्याच्या १३ वर्षापेक्षा कमी स्पर्धा :-
१) दिव्या मालणकर
२) मैथिली गावडे
३) झोया शैख
१०० मीटर धावण्याच्या १३ ते १८ वर्ष स्पर्धा :-
१) विनिता निकम
२) मेली डिसोझा
३) मान्यता पेडणेकर
१०० मीटर धावण्याच्या १८ वर्षापेक्षा जास्त स्पर्धा :-
१) सायली रावूळ
२) मृण्मयी कांबळे
३) नम्रता गावकर
२०० मीटर धावण्याच्या स्पर्धा १३ वर्षापेक्षा कमी स्पर्धा :-
१) दिव्या वेळीप
२) पायाल पवार
३) झोया शैख

२०० मीटर धावण्याच्या १३ ते १८ वर्ष स्पर्धा :-
१) वनिता निकम
२) मान्यता पेडणेकर
३) भार्गवी पाटकर
२०० मीटर धावण्याच्या १८ वर्षापेक्षा जास्त स्पर्धा :-
१) सायली रावूळ
२) मृण्मयी कांबळे
३) रेखा पुजारे
४०० मीटर धावण्याच्या स्पर्धा १३ वर्षापेक्षा कमी स्पर्धा :-
१) मैथिली गावडे
२) अनु निकम
३) सानिका पवार
४०० मीटर धावण्याच्या १३ ते १८ वर्ष स्पर्धा :-
१) सुवर्ण वाघमारे
२) गौरी परब
३) मनीषा पवार
४०० मीटर धावण्याच्या १८ वर्षापेक्षा जास्त स्पर्धा :-
१) निकिता लाड
२) नम्रता गावकर
३) रेखा पुजारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!