सावंतवाडी येथे 08 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम

सावंतवाडी येथे 08 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम

*कोंकण एक्सप्रेस*

*सावंतवाडी येथे 08 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम*

*तिरोडा वार्ताहर :- प्रतिनिधी*

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) :- सावंतवाडी येथे फिटनेस योग फाउंडेशन अंतर्गत फिटनेस महिला अकॅडमी सिंधुदुर्ग मार्फत रविवार दिनांक 08 मार्च 2026 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त सकाळी 07.30 वाजता शंभरी पार महिलांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सर्व साधकांनी मंगला केशव भावे ( सबनीसवाडा – सावंतवाडी ), आनंदी लक्ष्मण सावंत ( सबनीसवाडा – सावंतवाडी ), सुनिता गजानन बांदेकर ( सबनीसवाडा – सावंतवाडी ), प्रमिला शिवराम प्रभुदेसाई ( सबनीसवाडा – सावंतवाडी ), राधाबाई बाबुराव होडावडेकर ( खासकीलवाडा – सावंतवाडी ) या महिलांचा पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करून सर्वांना खाऊ भरविण्यात आले.
त्यावेळी फिटनेस महिला अकॅडमी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष रसिका सावंत, उपाध्यक्ष चेतना शिंदे, कोषाध्यक्ष निशिगंधा सावंत, सहसचिव अनघा चव्हाण, फिटनेस योगचे शिक्षक शेखर बांदेकर तसेच निशा गवळी, रुपाली पेडणेकर, अनिशा घाडी, प्रगती बामणे, समिता गावडे, तृप्ती मालवणकर, रामनाथ सावंत, नारायण सावंत, अरुण पवार, रवींद्र प्रभू-देसाई, काशिनाथ पेडणेकर, अनिल मेस्त्री, विशाल लातये व सर्व योगसाधक उपस्थित होते. या आगळ्या – वेगळ्या उपक्रमाची सिंधुदुर्ग जिल्हा व सर्वच स्थरातून प्रशंसा होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!