निबंध स्पर्धेत शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव प्रशालेची खुशी करंगुटकर द्वितीय

निबंध स्पर्धेत शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव प्रशालेची खुशी करंगुटकर द्वितीय

*कोंकण एक्सप्रेस*

*निबंध स्पर्धेत शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव प्रशालेची खुशी करंगुटकर द्वितीय*

*शिवडाव ः प्रतिनिधी*

विंटर स्क्रॅच फेस्टिवल अंतर्गत गुरुजी एज्युकेशन
फाउंडेशन, मुंबई मार्फत विविध स्पर्धा ऑनलाईन स्वरूपात आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यातील शालेय गटातील निबंध व मुलाखत स्पर्धेत शिवडाव माध्यमिक विद्यालयाची खुशी महेश करंगुटकर हिने द्वितीय क्रमांक पटकावला. खुशी करंगुटकर हिने ‘मला कोणत्या जगात रहायचे आहे’ या विषयावर निबंध व सादरीकरण केले होते. तिला शिक्षक सौ. रिया गोसावी, गणेश वर्षे, भाग्यश्री पाताडे, पूजा मेस्त्री, स्वप्नील तांबे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल खुशी हिचे शिवडाव सेवा संघ, मुंबईचे अध्यक्ष मोहन पाताडे, कार्यवाह श्री काशीराम गावकर व पदाधिकारी शालेय समिती अध्यक्षा भाग्यरेखा दळवी, व सदस्य, मुख्याध्यापक मुकेश पवार आदींनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!