हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी – जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत

हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी – जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत

*कोंकण एक्सप्रेस*

*हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी – जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत*

*सिंधूदुर्ग* 

काँग्रेस पक्ष हा नेहमीच हिंदू द्वेष करत आला आहे आणि आपल्या वाक्यातून सांप्रदायिक द्वेष कसा पसरवता येईल याकडे या पक्षाच्या नेत्यांचे नेहमीच लक्ष असते.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांना समकक्ष पहावे अशी टिप्पणी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांना जाणता राजा असा संबोधले जाते तर टिपू सुलतान हा क्रूरकर्मा आहे.
शत्रुगटातील स्त्रीला आईची उपमा देणारे शिवछत्रपती कुठे आणि शत्रुगटातील स्त्रीवर अत्याचार करून त्यांना जनानखान्यात दाबून ठेवणारे सुलतान यांची तुलनाच होऊ शकत नाही. शौर्याची तुलना क्रौर्याशी करणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षांचा सिंधुदुर्ग जिल्हा भाजप कडून मी निषेध करत आहे. खरंतर महाविकास आघाडी कडून सध्या एकत्र आलेले इतर पक्ष आणि त्यांचे नेते यांनीही याबाबतीत आपली स्पष्ट भूमिका मांडणे गरजेचे आहे. छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची तुलना टिपू सारख्या सैतानाची करणे हे महाविकास आघाडीतील घटक पक्षांना मान्य आहे का? त्यांचे यावरचे मौन पाहता त्यानां ही भूमिका मान्य असल्याचे जाणवते.
स्त्रियांना कैदी बनवू नये ही शिवछत्रपतींची विचारसरणी आणि याउलट स्त्रीयांना कैद करून त्यांच्यावर सामूहिक अत्याचार करणे ही टिपूची विचारसरणी, याची तुलना कशी काय होऊ शकते याबाबत काँग्रेस सहित इतर पक्षांनी उत्तर द्यावे. टिपू सैतानाच्या आक्रमणास तोंड देणे अशक्य होते अशा स्त्रियांनी नदीमध्ये उड्या टाकून आपल्या आयुष्य संपवले होते अशा कटू आठवणी सोबत असताना टिपू चे उदात्तीकरण करणाऱ्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी त्वरित माफी मागावी. महाराष्ट्र त्यांना कदापी माफ करणार नाही. सिंधुदुर्ग भाजप आणि सिंधुदुर्गवासीयां तर्फे हर्षवर्धन सपकाळ यांचा जाहीर निषेध!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!