शिवजयंतीनिमित्त अ‍ॅड. गवस यांची कारवार येथे व्याख्यानासाठी निवड

शिवजयंतीनिमित्त अ‍ॅड. गवस यांची कारवार येथे व्याख्यानासाठी निवड

*कोंकण एक्सप्रेस*

*शिवजयंतीनिमित्त अ‍ॅड. गवस यांची कारवार येथे व्याख्यानासाठी निवड*

*दोडामार्ग : शुभम गवस*

तालुक्यातील पिकुळे गावचे सुपुत्र, तालुका मराठा संघटनेचे माजी अध्यक्ष व उत्तम वक्ते अ‍ॅड. सोनू गवस यांना माजाळी (ता. कारवार) येथे शिवप्रतिष्ठान भांडीशिट्टा यांच्या वतीने शिवजयंती निमित्त विशेष निमंत्रण देण्यात आले आहे.
दोडामार्ग व सिंधुदुर्ग जिल्ह्यात छत्रपतींचे विचार जोमाने मांडत असताना, आता अ‍ॅड. गवस यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार कर्नाटक राज्यात मांडण्याची संधी मिळणार आहे.
या कार्यक्रमास कर्नाटक राज्यातील अनेक पुरस्कारप्राप्त मान्यवर उपस्थित राहणार असून, एवढ्या मोठ्या व्यासपीठावर गवस यांना निमंत्रण मिळाल्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!