नागरिकांच्या सुरक्षेशी खेळ सहन करणार नाही – लोकप्रतिनिधींचा इशारा

नागरिकांच्या सुरक्षेशी खेळ सहन करणार नाही – लोकप्रतिनिधींचा इशारा

*कोंकण एक्सप्रेस*

*नागरिकांच्या सुरक्षेशी खेळ सहन करणार नाही – लोकप्रतिनिधींचा इशारा*

*दोडामार्ग:: शुभम गवस*

दोडामार्ग : आंबेली–कोनाळकरवाडी परिसरात झालेल्या अपघातानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी ठेकेदाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. दोडामार्ग येथील झरेबांबर पंचायत समिती सदस्य स्नेहा संजय गवस यांनी रस्ता सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी ठेकेदाराची असल्याचे सांगत तात्काळ दुरुस्तीची मागणी केली.
अपघाताची माहिती मिळताच स्नेहा गवस, सरपंच अनिल शेटकर व आपा गवस यांनी घटनास्थळी भेट दिली. मात्र, संबंधित अधिकारी व ठेकेदार अनुपस्थित असल्याने संताप व्यक्त करण्यात आला. ठेकेदाराला घटनास्थळी बोलावून सुरक्षेच्या उपाययोजना न केल्याबद्दल जाब विचारण्यात आला.
दरम्यान, संध्याकाळपर्यंत काम सुरू न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा लोकप्रतिनिधींनी दिला असून नागरिकांनी प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!