सावंतवाडी नगरपरिषद: सुधीर आडीवरेकर यांची आरोग्य व क्रीडा सभापतीपदी निवड; विषय समित्या जाहीर

सावंतवाडी नगरपरिषद: सुधीर आडीवरेकर यांची आरोग्य व क्रीडा सभापतीपदी निवड; विषय समित्या जाहीर

*कोंकण एक्सप्रेस*

*सावंतवाडी नगरपरिषद: सुधीर आडीवरेकर यांची आरोग्य व क्रीडा सभापतीपदी निवड; विषय समित्या जाहीर*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

सावंतवाडी नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतींची निवड आज जाहीर करण्यात आली. यामध्ये आरोग्य व क्रीडा सभापतीपदी सुधीर आडीवरेकर यांची वर्णी लागली आहे. या निवडीसोबतच पालिकेच्या सर्व महत्त्वाच्या समित्यांचे गठन पूर्ण झाले असून, यामध्ये सत्ताधारी भाजपसह शिवसेना, काँग्रेस आणि उबाठा शिवसेना अशा सर्वपक्षीय नगरसेवकांना स्थान देण्यात आले आहे.
महत्त्वाच्या समित्या आणि नवनियुक्त सभापती:
स्थायी समिती आणि सदस्य:
नगरपरिषदेच्या अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या पदसिद्ध सभापतीपदी नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले असून, सदस्य म्हणून उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर, आनंद नेवगी, सुधीर आडिवरेकर, प्रतिक बांदेकर, दिपाली भालेकर आणि मोहीनी मडगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सर्वपक्षीय प्रतिनिधींना संधी:
आरोग्य व क्रीडा समितीत नगरसेविका निलम नाईक, वीणा जाधव, नगरसेवक देव्या सुर्याजी, आणि अॅड. सायली दुभाषी यांचा समावेश आहे. याशिवाय:
• शिवसेना: बाबु कुडतरकर, अजय गोंदावळे, देव्या सुर्याजी, स्नेहा नाईक, सायली दुभाषी, शर्वरी धारगळकर यांची सदस्य म्हणून निवड.
• काँग्रेस: तौकीर शेख यांना विषय समिती सदस्यपदी संधी.
• उबाठा शिवसेना: देवा टेमकर यांचीही सदस्य म्हणून वर्णी लागली आहे.
या निवडीनंतर नवनियुक्त सभापती व सदस्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!