*कुणकेश्वर यात्रोत्सव प्लास्टीक मुक्त करण्यासाठी प्रशासन सज्ज; सर्व व्यापारी, भाविकांनी सहकार्य करण्याचे गटविकास अधिकारी देवगड अरूण चव्हाण यांचे आवाहन*

*कुणकेश्वर यात्रोत्सव प्लास्टीक मुक्त करण्यासाठी प्रशासन सज्ज; सर्व व्यापारी, भाविकांनी सहकार्य करण्याचे गटविकास अधिकारी देवगड अरूण चव्हाण यांचे आवाहन*

*कोंकण एक्सप्रेस*

*कुणकेश्वर यात्रोत्सव प्लास्टीक मुक्त करण्यासाठी प्रशासन सज्ज; सर्व व्यापारी, भाविकांनी सहकार्य करण्याचे गटविकास अधिकारी देवगड अरूण चव्हाण यांचे आवाहन*

*देवगड ः प्रतिनिधी*

सिंधुदूर्ग जिल्हा प्लास्टीक मुक्त करण्याचा भाग म्हणून यंदाचे प्रसिद्ध यात्रोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतलेला आहे. दिनांक १५ ते १७ फेब्रुवारी दरम्यान होणारा कुणकेश्वर यात्रोत्सव यावेळी पूर्णपणे ‘सिंगल युज प्लास्टिकमुक्त असणार आहे. यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने कडक नियमावली तयार केली आहे .

मुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, उपमुख्यकार्यकारी अधिकारी (ग्रा.प) जयप्रकाश परब यांच्या संकल्पनेतुन हा प्लास्टीक मुक्त यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले असुन या पर्यावरणपुरक उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन गटविकास अधिकारी देवगड अरूण चव्हाण यांनी केले आहे .

ओला व सुका कचरा गोळा करण्यासाठी स्टॉल धारकांना विशेष पिशव्यांचे वाटप होणार आहे. या उपक्रमात प्लास्टीक बंदी अधिनियमानुसार प्रतिबंधात्मक वस्तु आढळल्यास थेट दंड आकारण्यात येणार आहे .

भाविकांनी घरूनच कापडी पिशव्या सोबत आणण्याचे आवाहन तसेच पर्यायी वस्तू प्लास्टीक ग्लासेस आणि थर्माकोल ताटांऐवजी कागदी किंवा पत्रावळीचा वापर करण्याचे आवाहन असुन ग्रामपंचायत कुणकेश्वरच्या माध्यमातुनही व्यापारी वर्गाला सवलतीच्या दरात कापडी पिशव्या उपलब्ध होणार आहेत .

या प्लास्टीकमुक्त यात्रोत्सवात ग्रामपंचायत कुणकेश्वर व पंचायत समिती देवगडच्या माध्यमातून भरारी पथकांचे लक्ष राहणार आहे . तरी कुणकेश्वर यात्रोत्सव प्लास्टीक मुक्त करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे अव्हान करण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!