*जिल्ह्यातील इमारत बांधकाम कामगारांना लवकरच वितरीत होणार “अत्यावश्यक संच कीट”*

*जिल्ह्यातील इमारत बांधकाम कामगारांना लवकरच वितरीत होणार “अत्यावश्यक संच कीट”*

*कोंकण एक्सप्रेस*

*जिल्ह्यातील इमारत बांधकाम कामगारांना लवकरच वितरीत होणार “अत्यावश्यक संच कीट”*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

कल्याणासाठी तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्य व सुरक्षा आणि कल्याणसाठी शासनाकडून अनेक योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. शासनाकडून जिल्ह्यातील कामगारांसाठी यापूर्वी ग्रुहपयोगी वस्तु भांडी संच व सुरक्षा संच योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे. मंडळाकडून पात्र नोंदीत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक संच (Essencial kit) वितरण योजनेस जी मान्यता देण्यात आलेली होती त्या योजनेच्या अंमलबजावणीस जिल्ह्यात लवकरच शुभारंभ होणार असून जिल्ह्यातील हजारो नोंदीत कामगारांना अत्यावश्यक संच किट योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या अत्यावश्यक संचामध्ये पत्र्याची पेटी (Galvanized Trunk), प्लास्टिकची चटई (Plastic Mat), धान्य साठवण कोठी (क्षमता २५ किलो) (Grain Storage Tank) (Capacity 25 Kg), धान्य साठवण कोठी (क्षमता २२ किलो) (Grain Storage Tank) (Capacity 22 Kg), बेडशीट (Bedsheet), चादर (Chaddar), ब्लॅकेट (Blanket), साखर ठेवण्यासाठीचा डबा (क्षमता १ किलो) (एसएस २०२) (Sugar Container) (1Kg) (SS 202), चहा पावडर ठेवण्यासाठीचा डबा (क्षमता ५०० ग्रॅम) (एसएस २०२) (Tea Container) (500 gram) (SS 202), वॉटर प्युरिफायर (१८ लिटर) (Water Purifier) (18 ltr) (SS 202) with 2 candle या वस्तूंचा समावेश करण्यात आलेला आहे. याशिवाय नव्याने नोंदणी झालेल्या कामगारांना “सुरक्षा संच” (safety kit) वितरणास देखील कामगार विभागाने मान्यता दिली असून सदरचे किट जिल्ह्याला प्राप्तही झाले आहेत. जिल्ह्यातील कामगारांनी संघटनेच्या संपर्क कार्यालयाची संपर्क साधून अत्यावश्यक संच व सुरक्षा कीट योजनेच्या ऑनलाईन पूर्व नोंदणीसाठी संपर्क साधावा असे आवाहन शिवसेना कामगार नेते तथा स्वाभिमान कामगार संघटने प्रसाद गावडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!