नाटळ जिल्हा परिषद मतदारसंघात संदेश उर्फ गोट्या सावंतांचा दणदणीत विजय

नाटळ जिल्हा परिषद मतदारसंघात संदेश उर्फ गोट्या सावंतांचा दणदणीत विजय

*कोंकण एक्सप्रेस*

*नाटळ जिल्हा परिषद मतदारसंघात संदेश उर्फ गोट्या सावंतांचा दणदणीत विजय*

*नाटळ : प्रतिनिधी*

नाटळ जिल्हा परिषद मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. सावंत यांनी ६३१३ मते मिळवत उद्धवसेनेचे उमेदवार उत्तम लोके यांचा पराभव केला. लोके यांना ११२० मते मिळाली.

या मतदारसंघात एकूण ७५३० मतांचे मतदान झाले असून ९७ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. संदेश सावंत यांनी ५१९३ मतांचे स्पष्ट मताधिक्य मिळवत मतदारसंघावर आपले वर्चस्व सिद्ध केले.

या निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून नाटळ मतदारसंघात भाजपची ताकद अधिक भक्कम झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!