महिला नेतृत्वाचा उदय; मणेरीत सौं. प्रीती धुरींच्या प्रचाराला वेग

महिला नेतृत्वाचा उदय; मणेरीत सौं. प्रीती धुरींच्या प्रचाराला वेग

*कोंकण एक्सप्रेस*

*महिला नेतृत्वाचा उदय; मणेरीत सौं. प्रीती धुरींच्या प्रचाराला वेग*

*दोडामार्ग : शुभम गवस*

मणेरी पंचायत समिती मतदारसंघातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस रंगत असून शिवसेना (ठाकरे गट) कडून सौं. प्रीती बाबुराव धुरी यांनी निवडणूक रिंगणात दमदार प्रवेश केला आहे. सासोली गावची लेक म्हणून ओळख असलेल्या प्रीती धुरी यांना मतदारसंघातील जनतेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
सामाजिक जाणीव आणि लोकांशी जवळीक ही त्यांची ओळख मानली जाते. माहेर सासोली या मतदारसंघातच असल्यामुळे स्थानिक प्रश्नांची त्यांना चांगली जाण असून, मतदारांशी त्यांचे घट्ट नाते निर्माण झाले आहे. गावोगावी जाऊन नागरिकांच्या समस्या समजून घेण्यावर त्यांनी भर दिला असून, त्यामुळे त्यांच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसेच युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. ग्रामीण भागातील पाणी, रस्ते, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत सुविधांवर विशेष लक्ष देण्याचा त्यांचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
शिवसेना (ठाकरे गट) च्या विचारधारेवर विश्वास ठेवून लोकाभिमुख विकास साधण्याचा संकल्प सौं. प्रीती धुरी यांनी व्यक्त केला आहे. पंचायत समिती स्तरावर सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
मणेरी मतदारसंघात महिला उमेदवार म्हणून सौं. प्रीती बाबुराव धुरी यांच्या उमेदवारीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, त्यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद मिळत असल्याने निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!