*कोंकण एक्सप्रेस*
*नांदगाव दशक्रोशीच्यावतीने उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना वाहिली श्रध्दांजली*
*स्व. अजित पवार यांच्यासारखा कणखर नेता होणे नाही ; मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना*
*कणकवली : प्रतिनिधि*
महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांचे अपघाती निधन झाले. महाराष्ट्रासाठी कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झालेली आहे. अजितदादा पवार यांनी संपूर्ण राज्यभरात निर्माण केलेलं काम , कार्य आणि त्यांचे विचार सर्वांनी जपले पाहिजेत. त्यांनी उभारलेल्या चांगल्या कामांचा आदर्श घेतला पाहिजे. त्यांच्या दुख:द घटनेमुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.स्व. अजित पवार यांच्यासारखा कणखर नेता होणे नाही अशा शब्दांत माजी जि.प.सदस्य संजय देसाई , प्रकाश पारकर, पंढरी वायंगणकर , पत्रकार भगवान लोके , भालचंद्र साटम , आदींसह मान्यवरांनी श्रध्दांजली वाहिली.
नांदगाव तिठा येथे नांदगाव दशक्रोशीच्यावतीने उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी यावेळी बिनविरोध पंचायत समिती सदस्या हर्षदा वाळके, माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम , असलदे सरपंच चंद्रकांत डामरे , नांदगाव सरपंच भाई मोरजकर, अण्णा खाडये , समीर शेटये, रघुनाथ लोके , बाबू फाटक , संतोष वायंगणकर , पांडूरंग चव्हाण , कोळोशी सरपंच गुरुनाथ आचरेकर, सुशील इंदप, चंदू शिंदे , सुभाष इंदप , आप्पा इंदप , माजी सरपंच श्री. पोकळे, दयानंद हडकर , माजी सरपंच सुरेश लोके, उपसरपंच सचिन परब, प्रविण डगरे, प्रदिप हरमलकर, संतोष घाडी , संतोष परब , उदय परब , बाबू परब , सतीश पोकळे , कमलेश पाटील , मारुती मोर्ये , राजू खोत , राजू तांबे , आबा बिडये , इरफान साटविलकर , यासीन मास्के ,यासीन पाटणकर , हनुमंत वाळके, निरज मोर्ये , तोंडवली सरपंच मनाली गुरव , अशोक बोभाटे , श्री. शेटये , रवी बोभाटे , सुनील बोभाटे , विलास कांडर , दिनेश कांडर , गणेश पाताडे , महेश लोके, विजय आचरेकर , प्रशांत परब, मनोज लोके , संदेश आचरेकर, प्रकाश आचरेकर , बाबाजी शिंदे , सुभाष तांबे , आत्माराम घाडी , विजय खरात , रुपेश खरात , राजू राणे आदींसह नांदगाव दशक्रोशीतील कार्यकर्ते उपस्थित होते.

