*कोंकण एक्सप्रेस*
*कोकणच्या राजकारणात मोठी खळबळ..!*
*ठाकरे शिवसेनेला मोठा धक्का; सतीश सावंत यांचा राजीनामा..!*
*कणकवली : प्रतिनिधी*
कणकवली विधानसभा अध्यक्ष आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी ठाकरे शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. सत्तेतील पक्षात जाण्याबाबत उद्या दुपारपर्यंत ते अधिकृत घोषणा करणार आहेत.
राजीनाम्याची प्रमुख कारणे : विकासकामांचा ध्यास: रखडलेली धरणे, पाटबंधारे प्रकल्प आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सत्तेत राहणे आवश्यक.शेतकरी हित: काजू हमीभाव, आंबा बागायतदार आणि ‘सिंधूरत्न’ योजनेला गती देण्यासाठी मोठा निर्णय.कार्यकर्त्यांचा कौल: ठाकरे शिवसेनेची सध्याची परिस्थिती पाहता कार्यकर्त्यांचा कल सत्तेतील पक्षाकडे.”लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि सहकार क्षेत्राला पुढे नेण्यासाठी सत्तेतील पक्षाची साथ घेण्याची वेळ आली आहे.” – सतीश सावंत
जिल्ह्यातील राजकीय समीकरणे आता पूर्णपणे बदलणार! सतीश सावंत नेमकी कोणती वाट धरतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

