*कोंकण एक्सप्रेस*
*जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्र अध्यक्षपदी नारायण पांचाळ यांची तर सरचिटणीसपदी राजेंद्र साळसकर यांची निवड*
*शिरगांव : संतोष साळसकर*
मुंबई- जर्नालिस्ट् युनियन ऑफ महाराष्ट्र, (जेयुएम) यांच्या अलिबाग जिल्हा रायगड येथे पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी जाहिर झाली असून जेष्ठ पत्रकार नारायण पांचाळ यांची सर्वानुमते अध्यक्षपदी तसेच राजेंद्र साळसकर यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे.
जर्नालिस्ट युनियन ऑफ महाराष्ट्रच्या मुंबई व महाराष्ट्रच्या सर्व सभासद व पदाधिकारी यांची संघटनात्मक बैठक व अभ्यास सहल कोवी रिसॉर्ट, नागाव बीच, अलिबाग, जिल्हा रायगड येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती.
यावेळी सन २०२६- २०२८ साठी राज्य कार्यकारिणी निवडण्यात आली.यामध्ये प्रामुख्याने
१) नारायण पांचाळ अध्यक्ष
२)बी. डी. गायकवाड उपाध्यक्ष
३) काशिनाथ माटल- उपाध्यक्ष
४) राजेंद्र साळसकर सरचिटणीस
५) अॅड. नामदेव काशीद- चिटणीस
६) सतीश साटम खजिनदार
७) हेमंत सामंत- सल्लागारपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
राज्य कार्यकारी सदस्यपदी :गणेश चव्हाण,प्रवीण काजरोळकर,लालप्रताप सिंग,डॉ.भारती बारस्कर यांची तर राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून : अॅड.नाना अहिरे,दिलीप पटेल,
अॅड.प्रशांत गायकवाड,
निलेश फापाळे,अजेय जाधव,संजय खानविलकर,मुकेश धावडे,आनंद शिंपी,रमेश पाटील,सुबोध शाक्यरत्न
सोनल खानोलकर
यांची निवड करण्यात आली आहे.
संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष नारायण पांचाळ हे गेली २२ वर्षे राज्य व राष्ट्रीय पातळीवर युनियनचे प्रतिनिधित्व करीत असून, ग्रामपातळी पासून ते राज्य व राष्ट्रीय पातळीवर सक्रियपणे कामगिरी बजावत आहेत.नवनिर्वाचित सरचिटणीस राजेंद्र साळसकर यांनी शिवनेरकार विश्वनाथराव वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली दैनिक शिवनेर मधून पत्रकारितेला सुरूवात केली असून गेली ३६ वर्षे ते पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत.नारायण पांचाळ व राजेंद्र साळसकर हे जर्नालिस्ट युनियनच्या माध्यमातून
राज्यातील पत्रकारांचे विविध प्रश्न व कल्याणकारी योजना राबवण्यासाठी व त्यांचा सातत्याने पाठपुरावा ते युनियनचे माध्यमातून करीत असतात.
कोकणात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावाने पत्रकारिता विद्यापीठ स्थापन व्हावे, जेष्ठ पत्रकारांना देण्यात येणाऱ्या पेन्शन योजनेच्या अटी, नियमात शिथिलता मिळावी, ग्रामीण भागातील पत्रकारांना शासनाचे अधिस्वीकृती पत्र देण्यात प्राधान्य द्यावे, कारण खरी गरज ग्रामीण भागात काम करणाऱ्या पत्रकारांना आहे. अशा महत्वाच्या मागण्या नारायण पांचाळ त्यांनी संघटनेच्या माध्यमातून सरकारकडे लावून धरल्या आहेत. तसेच त्याबाबतचा पाठपुरावा सातत्याने करण्यात येत आहे. पत्रकारिता क्षेत्रातील भरीव कामगिरी प्रमाणेच नारायण पांचाळ व राजेंद्र साळसकर यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय काम आहे. त्यांच्या या निवडीबद्दल पत्रकार क्षेत्रातून व विविध क्षेत्रातून त्यांचे व नुतन कार्यकारिणीचे अभिनंदन करण्यात येत आहे.

