*कोंकण एक्सप्रेस*
*राजकीय खळबळ: शेवटच्या क्षणी बाजी पलटली! दाभोलीचे सुपुत्र सखाराम (दादा) सारंग मैदानात; ‘एबी’ फॉर्मसह उमेदवारी निश्चित*
*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*
वेंगुर्ला तालुक्यातील आडेली जिल्हा परिषद सदस्य पदासाठी निवडणूक लढविण्यासाठी दाभोली गावचे युवा नेतृत्व महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष श्री.सखाराम(दादा) सचिन सारंग इच्छुक होते. निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काही वेळ शिल्लक असताना दादा सारंग यांना शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून एबी फॉर्म देऊन दादा सारंग यांना शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून जाहीर केले. सारंग यांनी यापूर्वी दाभोली ग्रामपंचायत सरपंच पदासाठी थेट निवडणूक लढवली होती. त्यांना काही अंतर्गत राजकारणामुळे पराभवाला सामोरे जावे लागले होते.पराभव होऊन सुद्धा जनतेच्या अडी अचणीत धाऊन जात गरजवंतांना आर्थिक मदत करणे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणे विभागातील विविध मंडळांना आर्थिक सहकार्य करणे धार्मिक कामात सहभाग घेणे क्रिकेट स्पर्धेत सहभाग घेऊन स्पर्धा घेऊन युवकांना प्रोत्साहित करणे.असे अनेक उपक्रम त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत आपले समाजसेवेचे कार्य सुरू ठेवले आहे .दाभोली ग्रामपंचायत सरपंच पदासाठी अपक्ष म्हणून निवडणूक लढून आपली युवा नेतृत्व म्हणून ताकद दाखवून दिली होती. दादा सारंग यांच्या मालकीचा साई स्पोर्ट्स दाभोली नावाने क्रिकेट संघ आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीशी युवा वर्ग मोठ्या प्रमाणात असून व थोर मोठ्यांसोबत मतदार संघात चांगले हीतसंबंध असून जिल्हा परिषद निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते.आज दादा सारंग यांना शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष योगेश कुबल यांनी पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी अधिकृत उमेदवारी जाहीर केली.भविष्यात आघाडी होईल की दादा सारंग उमेदवारी अर्ज मागे घेतलील किंवा बंडखोरी करतील याकडे सर्व आडेली जिल्हा परिषद मतदार संघाचे लक्ष लागून राहिले आहे.

