कणकवली रेल्वेस्टेशनवर जिल्हाधिकाऱ्यांकडून रॅपिड टेस्टचा आढावा

कणकवली रेल्वेस्टेशनवर जिल्हाधिकाऱ्यांकडून रॅपिड टेस्टचा आढावा

*कोकण Express*

*कणकवली रेल्वेस्टेशनवर जिल्हाधिकाऱ्यांकडून रॅपिड टेस्टचा आढावा*

*रेल्वेस्टेशनवर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची   होतेय तपासणी*

*कणकवली ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्गात कोरोनाचा कहर सुरू असतानाच खारेपाटण चेकपोस्टवर जिल्हा बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची रॅपिड टेस्ट करण्यास जिल्हा प्रशासनाने सुरुवात केली आहे. जेणेकरून जिल्ह्यातील कोरोनाचा कहर थांबावा यादृष्टीने प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आता कणकवली रेल्वेस्टेशनवरही रेल्वेने जिल्हा बाहेरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची रॅपिड टेस्ट होत आहे. त्याचा आढावा आज दुपारी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी व पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी घेतला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी रेल्वेस्टेशनवर असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांची संवाद साधत त्यांच्याकडून सुरू असलेल्या तपासणी व तेथील कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार आर. जे. पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पोळ, डॉ. कांदे, आरोग्य विभागाचे प्रशांत बुचडे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!