कॅलिफोर्नियाला कोकणासारखे बनावे असे वाटावे एवढी सुंदरता या गावामध्ये आहे-अभिनेता पृथ्वीक प्रताप

कॅलिफोर्नियाला कोकणासारखे बनावे असे वाटावे एवढी सुंदरता या गावामध्ये आहे-अभिनेता पृथ्वीक प्रताप

*कोंकण एक्सप्रेस*

*कॅलिफोर्नियाला कोकणासारखे बनावे असे वाटावे एवढी सुंदरता या गावामध्ये आहे-अभिनेता पृथ्वीक प्रताप*

*गावाच्या विकासाच्या उद्देशाने काम केल्याने अभियानात उतरण्यास पात्र-जयप्रकाश परब*

*फोंडाघाट : प्रतिनिधी*

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत सिंधुदुर्ग मधील विविध ग्रामपंचायतीमध्ये प्रचार व जनजागृती चे ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून काम करत असताना आज लोरे नं. १ या गावी आल्यापासून या ठिकाणी मी अनेक गोष्टी पाहिल्या, येथील सर्व गोष्टीचे नियोजन पहिले आणि त्याचे विश्लेषणही करत होतो एवढ्या ग्रामीण भागातही सोलर चा वापर करणारी सरकारी कार्यालय, आणि कदाचित कोणत्याही गावाने विचार केला नसेल अशा प्रकारे शहराच्या धर्तीवर सुसज्ज गार्डन या लोरे गावात पाहिल्या नंतर पूर्वी असं म्हणत होते की, “आपल्याला कोकणचा कॅलिफोर्निया करायचा आहे” पण लोरे नंबर एक गावाला पाहिल्यानंतर असे वाटायला लागले कॅलिफोर्निया नको कोकणच बरा! उलट कॅलिफोर्नियाला वाटावे कोकणासारखे बनावे एवढी सुंदरता या गावांमध्ये आहे अशी कौतुकाची थाप सिने अभिनेते पृथ्वीक प्रताप यांनी दिली,ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत प्रचार व जनजागृतीच्या कार्यक्रमावेळी बोलत होते.
दरम्यान यावेळी व्यासपीठावर सिने अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जयप्रकाश परब, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुळशीदास रावराणे, प. स. कणकवलीचे माजी सभापती मनोज रावराणे , लोरे नंबर एक चे सरपंच अजय रावराणे, उपसरपंच रसिका राणे, ग्रामपंचायत सदस्य सोनाली खाड्ये, समीक्षा मोसमकर,नरेश गुरव, सतीश कासले,सुप्रिया रावराणे, सुमन गुरव, जयदास तेली, प्रमिला तेली ग्रामसेवक राकेश गोळवणकर आधी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच पाहुण्यांच्या स्वागतासाठी शालेय मुलींकडून पारंपारिक नृत्य कार्यक्रम सादर करण्यात आला यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी उपस्थितांसमोर मनोगत व्यक्त करताना सिने अभिनेते पृथ्वी प्रताप पुढे म्हणाले आम्ही सकाळपासून ठीक ठिकाणी गावांना भेटताना खूप धावपळ होत होती आम्ही जरी थकलो असलो तरी आम्हाला याची पूर्ण कल्पना आहे की आजच्या या दिवसासाठी तुम्ही मागील महिन्याभरात किती कष्ट घेतले असतील आजचा दिवस मी हा प्रदर्शनाचा दिवस म्हणतो. जिल्हा परिषद प्रशासनाच्या माध्यमा बरोबरच लोकसहभागातून पैसे जमा करून गावांमध्ये जी जी विकास कामे आपण केलेली आहेत या सर्व विकास कामांची आपण काळजी घेत असणारच कारण यामागे येथील प्रत्येक विकासात्मक गोष्ट मी बनवलेली आहे अशी भावना आपली असेल. आणि मगाशी सरपंच अजय रावराणे यांनी सांगितल्याप्रमाणेच आपण गावाच्या सुखासाठी, गावाच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना राबवत गेलो त्या कुठल्या स्पर्धेसाठी नसून आपले गाव विकसित व्हावे या हेतूने होते मात्र यातून आपण आपोआप स्पर्धेमध्ये आलो ही गोष्ट फार उल्लेखनीय आणि इतर गावांनी धडा घेण्यासारखी आहे.

सिने अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर
यावेळी अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर म्हणाल्या,आज सकाळपासून आम्ही सिंधुदुर्गातल्या वेगवेगळ्या गावांमध्ये फिरतोय पण तुम्ही सगळे ज्या पद्धतीने इतकी छान तयारी केली आहे इतका सुंदर विकास केलाय गावाचा तसेच इतर गावांमध्ये सुद्धा होतं त्यामुळे आम्हाला इथे यायला थोडासा उशीर झाला त्यामुळे मी माफी मागते पण इथे या गावात येऊन लोरे नंबर वन या गावात येऊन खरंच खूप छान वाटतंय मला मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान मार्फत लोरे नंबर वन या गावात येण्याची संधी मिळाली आणि त्या निमित्ताने कळलं की गावात इतका सुंदर विकास करण्यात आलेला आहे तुम्ही सगळेजण इतक्या नटून-थटून एकीने इथे उपस्थित आहात या अर्थी जाणवतंय की ग्रामपंचायत मध्ये तुम्ही किती मनापासून काम करत असणार आहात इतका सुंदर गार्डन आहे जी व्यायाम शाळा आहे ती पाहिली, तुमच्या लोरे नं. १ गावचं जे मंदिर आहे त्या मंदिराला भेट दिली तर खरंच खूप छान वाटलं आणि हे जे अभियान राबवलं जातंय त्यामध्ये तुम्ही हिरिरीने सहभागी होता वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आणि त्यात तुम्हा सगळ्यांना लाभ घेता येतोय त्याचा आणि गावाचा विकास होतो आणि गावाचा विकास हा गावातल्या प्रत्येकाचा विकास असतो तुम्ही पुढे जात आहे गाव पुढे जात आहे आणि हीच खूप आनंदाची आणि महत्त्वाची गोष्ट आहे तर मला सगळ्यांना कोकणची सुकन्या म्हणून खरंच खरंच खूप अभिमान वाटतोय.

जयप्रकाश परब
उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जयप्रकाश परब यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, लोरे नं १ गावाचे कौतुक करण्यासारखे आहे कारण या गावाने कोणतेही पारितोषिक मिळवण्याच्या उद्देशाने काम केले नाही तर आम्ही गावांमध्ये विकास काम करत गेलो आणि ती विकास काम केल्यामुळे हे गाव अभियनामध्ये उतरण्यास पात्र ठरले आहे, तेव्हा मित्रांनो हा उत्साह आहे हा ३१ मार्च २०२६ पर्यंत टिकून ठेवा आणि त्या पुढच्या परीक्षणापर्यंत तुमचा उत्साह टिकून राहिला तर निश्चितपणे लोरे नंबर एक जिल्ह्यातच काय राज्यात सुद्धा एक नंबरच राहील अशी मला खात्री वाटते.आणि आपला कोकण हा समृद्ध आहेच आणि हा समृद्ध करण्यासाठी आपल्या सर्वांचा हातभार लाभावा कारण ग्रामस्थांचं सहकार्य आणि एकोपा जिथे चांगल्या पद्धती चा असतो तिथेच असे या लोरे नं १ गावातील गार्डन सारखे चमत्कार बघायला मिळतात.

सरपंच अजय रावराणे
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत प्रचार व जनजागृती कार्यक्रमाची प्रस्तावना करताना सरपंच अजय रावराणे म्हणाले, आम्ही सर्व मिळून गावाचा विकास करत असताना आम्ही विकास कामे करत गेलो आणि आमच्या गावाला शासनाचा बहुमान मिळत गेला आमच्या गावाला सिंधुदुर्ग जिल्हा स्मार्ट ग्राम स्पर्धेचा प्रथम क्रमांक मिळाला असून संत गाडगेबाबा स्वच्छता मोहीम अंतर्गत जिल्हा शासनाचा पुरस्कारही आम्हाला प्राप्त आहे तसेच महाआवास अभियान 2023 24 मध्ये जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकही लोरे नंबर एक गावाला मिळाला आहे आणि खरोखरच आमच्या गावांमध्ये सांगायचं झाले तर आम्ही जे उपक्रम गावासाठी घेतले आहेत ते कुठल्या स्पर्धेसाठी किंवा पुरस्कारांसाठी घेतलेले नाही. आमचं गाव कुठेतरी विकसित झाले पाहिजे त्यासाठी आम्ही उपक्रम घेतले आहेत आणि त्यामुळे आम्ही ऑटोमॅटिक स्पर्धेमध्ये आलो आहोत म्हणजे आम्ही जे जे उपक्रम घेत आहोत लोकांसाठी त्याचाच बेनिफिट आमच्या या स्पर्धेमध्ये आम्हाला झाला आहे. आमची ग्रामपंचायत म्हणजे महाराष्ट्राची पहिली ग्रामपंचायत आहे की जी लोकांना पासबुक म्हणजे जी घरपट्टी पाणीपट्टी भरायला लोक येतात त्यांना आम्ही बँकेच्या धर्तीवर पासबुक देतो असा उपक्रम राबवणारी आमची पहिली ग्रामपंचायत असेल, त्याचप्रमाणे आमच्या संपूर्ण गावाला आम्ही फिल्टर युक्त शुद्ध पाण्याची व्यवस्था केलेली आहे त्याचप्रमाणे आमच्या ग्रामपंचायत च्या स्वतःच्या मालकीची येथील युवकांसाठी सर्वांसाठी सुसज्ज अशी व्यायाम शाळा सुद्धा काढण्यात आली आहे तसेच आमच्या ग्रामपंचायत अंतर्गत एक रुपया मध्ये एक लिटर शुद्ध पाणी मिळण्याचे वॉटर एटीएम उपक्रमही राबवला आहे तसेच गावा मध्ये स्वच्छता राहावी याकरिता दरवर्षी प्रत्येक वॉर्डनुसार “स्वच्छ घर परिसर” स्पर्धा उपक्रम राबविण्यात येतो यामधील विजयी वॉर्डामधील नागरिकांचा यथोचित सत्कार ही ग्रामपंचायत मार्फत केला जातो. तसेच आमच्या सर्व शासकीय इमारती,आमची ग्रामपंचायत सोलरवर केलेल्या आहेत पण आमच्या गावांमध्ये सर्व घरे १००% सोलरवर करण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे आणि सर्व लोकानी त्याला चांगला प्रतिसाद दिला असून ह्या एक दोन महिन्यांमध्ये आमच्या गावातील ७० ते ८० टक्के घरांवर सोलर वीज असणार त्याचप्रमाणे आपण जे आता या गार्डनमध्ये उभे आहोत हे गार्डन लोकसहभागातून आम्ही उभा केलेला आहे म्हणजे शासनाचा आम्ही २० ते २५ लाख रुपये घेतले पण अतिरिक्त २५ लाख रुपये आम्ही लोकांच्या सहभागातून हे रुजेश्वर गार्डन उभे केलेले आहे म्हणजे ग्रामीण भागात नगरपालिकेच्या धर्तीवर सुसज्ज गार्डन उपलब्ध करून देणारी महाराष्ट्रातील ही पहिली ग्रामपंचायत असेल. दरवर्षी पर्यावरण पूरक इको फ्रेंडली गणेशोत्सव स्पर्धा ग्रामपंचायत मार्फत राबवली जाते तसेच घर तेथे शोषखड्डा हा ही उपक्रम ग्रामपंचायत मार्फत राबवला जातो. आपल्या गावातील लोकांना शासकीय दाखले मिळवण्यासाठी लांब जावे लागू नये याकरिता ग्रामपंचायत मार्फत आपले सेवा केंद्र ही चालू करण्यात आले आहे तसेच येथील सर्व शाळांमध्ये मुलांसाठी डिजिटल शिक्षणाची ही व्यवस्था ग्रामपंचायत मार्फत करण्यात आली आहे या गावांमध्ये सुसज्ज असे आयुष्यमान सेवा केंद्र सुरू असून अशा प्रकारची उपक्रम गावाच्या विकासासाठी आम्ही राबवत गेलो आणि विकासाची काम करत असताना आम्ही या स्पर्धेसाठी आपोआप पात्र झालेलो आहोत त्यामुळे जे काही निकष आपल्या स्पर्धेमध्ये आहेत ते आपोआप आम्ही पूर्ण केलेले आहेत आणि खरोखरच लोकांचा एवढा सहभाग आहे आणि या सहभागामध्ये बघा तुम्ही की महिलांची संख्या जास्त आहे आमच्यामध्ये आणि मला अभिमानाची गोष्ट आहे माझ्या गावातील महिला खूप जागरूक आहेत.
दरम्यान यावेळी प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजना टप्पा दोन मध्ये ज्या लाभार्थींची घरे पूर्ण झाली आहेत त्यांना मान्यवरांच्या हस्ते घराची चावी प्रदान करण्यात आली यामध्ये श्रीमती सुनिता एकनाथ सावंत, मोहन सिताराम गुरव, सतीश विष्णू गुरव, रवींद्र धोंडू रावराणे, प्रशांत भास्कर मोसमकर आदिना घरांच्या चावी देण्यात आल्या.
तर प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजना अंतर्गत मंजूर लाभार्थ्यांना जमीन उपलब्ध करून देण्यात आल्या यामध्ये घरकुल लाभार्थी संजय भास्कर मोसमकर,सुनिता एकनाथ सावंत, अशोक धोंडू मेस्त्री, रघुनाथ गंगाराम राणे, प्रकाश परशुराम एकावडे, सत्यवान दामोदर कर्ले यांना भागोजी गंगाराम घाडी, विशाखा विलास यादव, हरी दाजी राणे, प्रमोद धोंडू राणे, दीपक ज्ञानदेव एकावडे,हरिश्चंद्र शांताराम रावराणे,यांच्याकडून जमीन उपलब्ध करून देण्यात आल्या यावेळी जमीन उपलब्ध करून देणाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तर यावेळी लोरे नंबर एक ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात आलेल्या नवजात मुलींच्या नावे पाच हजार रुपयाची मुदत ठेव योजना यांची सर्टिफिकेट त्यांच्या मातांना प्रदान करण्यात आली यामध्ये श्रेया अंकुश देवलकर, सिया रवींद्र धुरी, आद्विका अशोक खाडये, कोमल संदीप धुमक यांच्या नावे काढण्यात आलेली पाच हजार रुपयाची मुदत बंद ठेव सर्टिफिकेट वितरित करण्यात आली
आज झालेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान प्रचार व जनजागृती कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन गाव गाता गजाली फेम निलेश पवार यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे नितीन पाटील यांनी आभार मानले आज झालेल्या कार्यक्रमां साठी लोरे नंबर एक येथील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती*

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!