जिल्हा परिषद शिरगाव–निमतवाडी शाळेचा २९ डिसेंबर रोजी शतकमहोत्सव

जिल्हा परिषद शिरगाव–निमतवाडी शाळेचा २९ डिसेंबर रोजी शतकमहोत्सव

*कोंकण एक्सप्रेस*

*जिल्हा परिषद शिरगाव–निमतवाडी शाळेचा २९ डिसेंबर रोजी शतकमहोत्सव*

*१०० वर्षे ज्ञानदान पूर्तता सोहळ्याचे आयोजन*

*शिरगाव : संतोष साळसकर*

देवगड तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिरगाव–निमतवाडी ही शाळा सोमवार, दि. २९ डिसेंबर रोजी आपला शतकमहोत्सव साजरा करीत असून, त्यानिमित्त १०० वर्षे ज्ञानदान पूर्तता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या ज्ञानदान पूर्तता सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षिका जयश्री शेलार राहणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून देवगड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे उपस्थित राहणार आहेत. तसेच ग्रुप ग्रामपंचायत शिरगाव–शेवरेचे सरपंच समीर शिरगावकर, शिक्षण विस्तार अधिकारी लहू दहिफळे, केंद्रप्रमुख बापू खरात, पोलीस पाटील आदित्य परब यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
शतकमहोत्सवानिमित्त २९ डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजता शोभायात्रा, सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, सकाळी १०.३० वाजता गुरुजनांचा व कर्तृत्ववान माजी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ, दुपारी १२.३० वाजता महाप्रसाद, दुपारी ३ वाजता स्थानिक भजने, तर सायंकाळी ७ वाजता खेळ पैठणीचा कार्यक्रम व माजी विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.
उपसरपंच वैष्णवी अहिर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्रिया राणवसे, शतकमहोत्सव समिती अध्यक्ष अजित राणे व जि. प. शाळा शिरगाव–निमतवाडीच्या मुख्याध्यापिका सायली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या शतकमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, या सर्व कार्यक्रमांना शिक्षक, पालक, ग्रामस्थ व माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!