नागनाथाच्या कृपेने विजय! संदेश पारकरांच्या यशानिमित्त तेरवण-मेढेत लवकरच महाप्रसाद व भजन-कीर्तन

नागनाथाच्या कृपेने विजय! संदेश पारकरांच्या यशानिमित्त तेरवण-मेढेत लवकरच महाप्रसाद व भजन-कीर्तन

*कोंकण एक्सप्रेस*

*नागनाथाच्या कृपेने विजय! संदेश पारकरांच्या यशानिमित्त तेरवण-मेढेत लवकरच महाप्रसाद व भजन-कीर्तन.*

*दोडामार्ग : शुभम गवस*

कणकवली नगरपंचायत निवडणुकीत शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संदेश पारकर यांनी दणदणीत विजय मिळविल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या विजयाबद्दल दोडामार्ग तालुक्यातील संजय नाईक यांनी तेरवण-मेढे येथील प्रसिद्ध श्री नागनाथ मंदिरात विशेष अभिषेक घालून देवाचे आभार मानले होते.
नागनाथाच्या कृपेनेच संदेश पारकर यांना यश प्राप्त झाले असून, या आनंदाच्या निमित्ताने येत्या पंधरा दिवसांच्या आत तेरवण-मेढे येथील श्री नागनाथ मंदिरात भाविकांसाठी महाप्रसाद तसेच भजन-कीर्तनाचा भक्तिमय सोहळा आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती संजय नाईक यांनी दिली.
दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दोडामार्ग तालुकाप्रमुख संजय गवस, विभागप्रमुख भिवा गवस, युवासेना पदाधिकारी सिद्धेश कासार तसेच संजय नाईक यांनी संदेश पारकर यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील सामाजिक व विकासात्मक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!