*कोंकण एक्सप्रेस*
*विद्यामंदिर कणकवली येथे माता-बालक-पालक मेळाव्याचे आयोजन*
*कणकवली ः संजना हळदिवे*
विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली मध्ये माता बालक पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रशालेचे मुख्याध्यापक डॉ.पी.जे. कांबळे, पर्यवेक्षक अच्युतराव वनवे, डॉक्टर आराधना मेस्त्री, संगीता साटम, विलास ठाकूर, नेहा सावंत, विद्या शिरसाठ उपस्थित होते. यावेळी डॉ.पी.जे.कांबळे यांनी स्त्रिया, मुली व शाळेतील विद्यार्थिनी यावरील वाढते अत्याचाराचे प्रमाण लक्षात घेऊन विद्यामंदिर कणकवली मध्ये पालक व शिक्षक एकत्र येऊन माता बालक पालक समिती, उत्कर्षा समिती, सखी सावित्री समिती, महिला अत्याचार निवारण समिती अशा समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. या समित्यांद्वारे विद्यार्थिनींच्या आरोग्य विषयी, सुरक्षितते विषयी, हक्कां विषयी वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते व विद्यार्थिनींच्या समस्यांचे निराकरण केले जाते असे सांगितले.
प्रशालेचे पर्यवेक्षक अच्युतराव वनवे यांनी सांगितले की आज कार्यालयीन जागेत महिला व शाळांमध्ये विद्यार्थिनी 100% सुरक्षित राहिलेल्या नाहीत. त्यामुळे या समित्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे कार्य करणार आहेत. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉक्टर आराधना मेस्त्री यांनी मुलींचे लैंगिक शिक्षण, शारीरिक व भावनिक बदल, किशोरावस्थेतील मुलींमधील समस्या, सकस आहार इत्यादी विषयांवर उत्कृष्ट मार्गदर्शन केले.
प्रशालेचे शिक्षक
विलास ठाकूर यांनी कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई, निवारण) कायदा 2013 विषयी उपस्थितांना माहिती दिली.
या कार्यक्रमाला प्रशालेतील माता-पालक बहुसंख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या शेवटी प्रशालेच्या सर्व शिक्षिका व माता पालक यांनी
विद्यार्थिनींच्या समस्या व त्यावर उपाय योजना यावर चर्चा केली.

