किंजवडे येथील महालक्ष्मी बचतगटाच्या महिलांची सामाजिक बांधिलकी जि. प. शाळा

किंजवडे येथील महालक्ष्मी बचतगटाच्या महिलांची सामाजिक बांधिलकी जि. प. शाळा

*कोंकण एक्सप्रेस*

*किंजवडे येथील महालक्ष्मी बचतगटाच्या महिलांची सामाजिक बांधिलकी जि. प. शाळा*

*किंजवडे–ठाकूरवाडी परिसराची स्वयंप्रेरणेने स्वच्छता*

*शिरगाव : संतोष साळसकर*

देवगड तालुक्यातील किंजवडे येथील महालक्ष्मी स्वयंसहाय्यता बचतगटाच्या महिलांनी सामाजिक बांधिलकी जपत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किंजवडे–ठाकूरवाडी प्रशालेच्या संपूर्ण परिसराची स्वयंप्रेरणेने स्वच्छता केली. या उपक्रमामुळे शाळेचा परिसर स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी झाला आहे.
या स्वच्छता मोहिमेत शाळेच्या वर्गाबाहेरील परिसर, अंगण, प्रवेशद्वार, निचरा व्यवस्था तसेच आजूबाजूचा परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला. जमा झालेल्या कचऱ्याचे योग्य प्रकारे वर्गीकरण करून त्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली आहे.
या उपक्रमात बचतगटाच्या अध्यक्ष उर्मिला तळवडेकर यांच्यासह सत्यवती चव्हाण, भारती चव्हाण, रोशनी चव्हाण, राजेश्री चव्हाण, मनीषा म. चव्हाण, सुनंदा ठाकूर, सुगंधा ठाकूर व मनीषा मो. चव्हाण यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
महालक्ष्मी स्वयंसहाय्यता बचतगटाच्या महिलांनी दाखवलेली स्वयंप्रेरणा व समाजाभिमुख कृती इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. या उपक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच ग्रामस्थांनी बचतगटाच्या महिलांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!