शिक्षण हे स्वयंसिद्ध होण्याचे साधन : प्रकाश जाधव

शिक्षण हे स्वयंसिद्ध होण्याचे साधन : प्रकाश जाधव

*कोंकण एक्सप्रेस*

*शिक्षण हे स्वयंसिद्ध होण्याचे साधन : प्रकाश जाधव*

*कर्ले महाविद्यालयाच्या ओंबळ येथिल निवासी श्रमसंस्कार शिबीराचे उद्घाटन*

*शिरगांव : संतोष साळसकर*

जागचं नेतृत्व करण्याची क्षमता आपल्या देशात आहे. श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून राष्ट्रप्रेमाबरोबरच विद्यार्थ्यामध्ये एकात्मेची रुजवात होईल. शिक्षण हे स्वयंसिद्ध होण्याचे साधन आहे.विद्यार्थ्यांनी गुणात्मक नव्हे तर दर्जात्मक शिक्षण घ्यावे. असे मार्गदर्शन शिरगांव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक अँड. प्रकाश जाधव यांनी ओंबळ येथे केले.
शिरगांव येथिल पुंडलीक अंबाजी कर्ले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवशीय निवासी श्रमसंस्कार शिबीराच्या बुधवारी पार पडलेल्या उद्घाटन सोहळ्य प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिबिरार्थीशी संवाद साधताना अँड. प्रकाश जाधव म्हणाले, महात्मा गांधीनी पाहिलेले ग्रामविकासाचे स्वप्न तरुणांच्या हातात दिलेले आहे राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबीरांच्या माध्यमातून त्याची रुजवात होत आहे. मोबाईलचा उपयोग रिल बनविण्यापेक्षा समाजाच्या सत्कारणी लागावा. आपली वाचन संस्कृती लोप पावत आहे हे विसरून चालणार नाही असा मोलाचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला
अध्यक्षीय भाषणात संस्थेचे उपाध्यक्ष संभाजी साटम म्हणाले, ग्रामविकास अर्थकारणाचा कणा आहे. येथिल मुबलक साधन संपत्तीचा उपयोग करून ग्रामविकास साधता येईल. शिबिरातून ग्रामस्थांना मान्यवराचे मार्गदर्शन लाभणार आहे. शिबिरार्थीनी केलेले काम सर्वासांठी आदर्शव्रत ठरेल
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत शिबीराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते वृक्षाला जल अर्पण करूम झाले. उद्घाटन सोहळ्यास गांवातील सेवानिवृत शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, तसेच मोठ्यासंख्येने महिलावर्ग उपस्थित होता.
निवासी शिबीराच्या उद्घाटन सोहळ्यास सरपंच अरुण पवार, उद्योजक नितीन पवार, सेवानिवृत्त मंडल अधिकारी श्यामसुंदर जाधव, देवस्थान समिती अध्यक्ष राजनकुमार कदम, ग्रामविकास अधिकारी मंगेश साळसकर,पोलीसपाटील संजय पवार, शिरगांव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शाळा समिती चेअरमन विजयकुमार कदम, सदस्य दिनेश साटम, मंगेश लोके, मुख्याध्यापक शमशुद्दीन आत्तार, पर्यवेक्षक उदयसिंग रावराणे, ओंबळ प्राथामिक शाळेचे मुख्याध्यापक संभाजी पाटील, राष्ट्रीय सेवायोजनेच्या कार्यक्रमअधिकारी प्राध्यापिका कोमल पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य समिर तारी यांनी केले. सुत्रसंचालन ॲॅकॅडमिक कोऑर्डीनेटर प्राध्यापिका सिद्धी कदम यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्राध्यापिका अक्षता मोंडकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!