*कोंकण एक्सप्रेस*
*साळशी गावात चार दिवस दूरसंचार सेवा ठप्प : 2 जी, फोन सेवा बंद*
*शिरगांव : संतोष साळसकर*
देवगड तालुक्यातील साळशी गावचा दूरसंचार संभाषण संपर्क व्यवस्था गेले 4 दिवस असून 2 जी सेवा बंद पडली असल्याने ग्राहकांची फार मोठी गैरसोय होत आहे.
तसेच फोन जी सेवा देखील व्यवस्थीत चालत नाही. आवाज न येणे, संभाषण चालू असताना मधेच फोन बंद पडणे तसेच संपर्कासाठी नंबर दोन तिन वेळा प्रयत्न केल्यानंतर विलंबाने संपर्क होतो.अशा अनेक समस्यांनी भ्रमणध्वनी धारक ग्राहक कंटाळे आहेत. या ठिकाणी भारत दूरसंचार कंपनी व्यतिरिक्त अन्य कोणताही पर्यायी सेवा कंपनी नसल्याने गैरसोय निर्माण झाली आहे.
आपत्कालीन वेळेला तसेच वैधकीय मदतीसाठी संपर्क साधण्यासाठी रात्री अपरात्री ६ की.मी.अंतरावर वहातूक करून शिरगाव ला जावे लागते.त्याच प्रमाणे ऑनलाईन कामे, कार्यालयीन कामे, धान्य दुकान वितरण व्यवस्था, विद्यार्थी ऑनलाईन अभ्यास तसेच शेतकरी शेती पाणी मोटर पंप, इतर व्यवसाय देवाण घेवाण व्यवहार बंद पडतात. त्यामुळे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. या संदर्भात ग्राहकांनी वेळोवेळी दूरसंचार विभाग देवगड व सावंतवाडी कार्यालय येथे संपर्क साधला व अनेक वेळा लेखी पत्रव्यवहार केले आहेत. ग्राम पंचायत कार्यालय साळशी यांनी या समस्येकडे संपूर्ण सविस्तर अहवाल पाठविला आहे.
त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष केले गेला असून कोणतीही कार्यवाही केली नाही. यामुळे ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. दूरध्वनी ग्राहकाने देवगड दूरध्वनी कार्यालय सावंतवाडी कार्यालय यांच्याकडे लेखी तसेच शिरगावला जाऊन दूरध्वनी वरूनही संपर्क साधून वेळोवेळी समस्या तक्रारी कळविल्या आहेत. त्याकडे अध्यापर्यंत दुर्लक्ष केला गेला असून सदर तक्रारी बेदखल करण्यात आल्या असल्याने ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. साळशी सरपंच ग्रामपंचायत यांनी प्रबंधक सावंतवाडी विभागीय अभियंता देवगड यांना माहे ऑगस्ट पासून सतत पत्रव्यवहार व प्रत्यक्ष भेटून याबाबत समस्या निवारण करण्यासाठी मागणी करून देखील त्याची अद्याप पर्यंत पूर्तता किंवा निवारण करण्यासाठी कोणत्याही प्रकारे ग्रामपंचायत इकडे पत्रव्यवहार व कर प्रत्यक्ष कार्यवाहीसाठी काही हालचाली न केल्याने अखेर ग्रामपंचायत साळशी यांच्याकडून थेट माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयाकडे अडचण पत्रव्यवहार करून व ई-मेल द्वारे कळवून लक्ष वेधले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून दूर संचार विभाग देवगड सावंतवाडी यांना कळवून देखील त्यालाही दाद दिली न गेल्याने तसेच गेले चार दिवस साळशी येथील दूरध्वनी सेवा विस्कळीत झालेली असून संपर्क मध्येच बोलणे चालू असताना खंडित होणे आवाज न येणे इत्यादी अडचणी बरोबरच टू जी सेवा पूर्णपणे बंद पडली आहे. याबाबत गेले तीन दिवस सतत संपर्क साधून देवगड सावंतवाडी या कार्यालयांना कळून देखील चार दिवस उलटूनही त्यावर काहीही कार्यवाही न करता उलट संबंधित अधिकाऱ्यांकडून उद्धट उत्तरे मिळत असल्याने ग्राहकांमध्ये कमालीचा असंतोष पसरला असून सार्वजनिक सेवा विस्कळीत होऊन गावातील संपूर्ण यंत्रणा मेताकोटीला आली आहे. ऑनलाइनचे सर्व व्यवहार अडचणीचे झाले आहेत. लवकरच याबाबत आंदोलन उभारण्यासाठी ग्राहक एकवटले असून केव्हाही आकस्मिक आंदोलन करण्याच्या तयारीत ग्रामस्थ आहेत.

