*कोंकण एक्सप्रेस*
*विद्याथ्र्यांनी जाणून घेतले बँकेचे दैनंदिन कामकाज*
*वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव)*
बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या इयत्ता अकरावीतील वाणिज्य विभागाच्या विद्याथ्र्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेंगुर्ला शाखेला अभ्यास भेटदेत तेथील दैनंदिन कामकाज जाणून घेतले.
बँक व्यवस्थापक रूपेश पाटील यांनी बँकेच्या ठेवी, कर्जे, पैसे जमा आणि काढण्याबाबतचे नियम, व्याजदर, डिजिटल फसवणूक आदींची तर डेप्युटी मॅनेजर विपूल गवाड यांनी बँकेच्या कामकाजात झालेल्या नविन बदलाविषयी विद्याथ्र्यांनी सविस्तर माहिती दिली. ज्युनिअर असोसिएट प्रथमेश गुरव व भाग्यश्री माने यांनी बँकिंग क्षेत्रात येण्यासाठी द्यावा लागणा-या परीक्षा, अभ्यासक्रम, निवड प्रक्रियाविषयी माहिती देताना स्वत:ला आलेले अनुभव सांगून विद्याथ्र्यांना प्रेरीत केले. या क्षेत्र भेट अभ्यास कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ.धनराज गोस्वामी, पर्यवेक्षक डी.जे.शितोळे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी विद्याथ्र्यांसमवेत संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.एन.एल.गिरी यांनी केले. तर आभार प्रा.ए.एम.कदम यांनी मानले.
फोटोओळी – विद्याथ्र्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेंगुर्ला शाखेला अभ्यास भेट देत तेथील दैनंदिन कामकाज जाणून घेतले.

