*कोंकण एक्सप्रेस*
*राष्ट्रीय अॅबॅकस स्पर्धेत विराज सावंतचे यश*
*वेंगुर्ला प्रतिनिधी*
ठाणे येथील डॉ.काशिनाथ घाणेकर नाट¬गृहात 1 डिसेंबर ररोजी राष्ट्रीय अॅबॅकस स्पर्धेचे आयोजन केले होते. यात मूळचा सावंतवाडी येथील विराज सूरज सावंत याने 100 पैकी 96 गुण प्राप्त करत शालेय स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला.
विराज हा सध्या भांडुप येथील पराग विद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे. त्याच्या या यशामुळे सर्वत्र त्याचे अभिनंदन होत आहे.

