*कोंकण एक्सप्रेस*
*नगर वाचनालयातर्फे पाठांतर स्पर्धा*
*वेंगुर्ला प्रतिनिधी*
नगर वाचनालय वेंगुर्लातर्फे 27 डिसेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता स्व.पंडित जनार्दनशास्त्री कशाळीकर स्मृती पाठांतर स्पर्धा आयोजित केली आहे.
इयत्ता पाचवी ते सातवीसाठी मनाच्या श्लोकातील 1 ते 15 श्लोक तर इयत्ता आठवी ते दहावी गटासाठी ज्ञानेश्वरीतील अध्याय तिसरा 1 ते 15 ओव्या म्हणावयाच्या आहेत. प्रथम पाच विजेत्यांना अनुक्रमे 300, 250, 200 आणि 125ची दोन अशी बक्षिसे देण्यात येतील. ही स्पर्धा वेंगुर्ला तालुका मर्यादित असून 23 डिसेंबरपर्यंत मुख्याध्यापक, पालक किंवा विद्यार्थी यांनी आपली नावे संस्थेच्या कार्यालयात पाठवावी. अधिक माहितीसाठी 8275667090 यावर संपर्क साधावा असे आवाहन कार्याध्यक्ष अनिल सौदागर व कार्यवाह कैवल्य पवार यांनी केले आहे.

