वेंगुर्ले न.प. निवडणुकीत भाजपाने प्रचारात घेतली आघाडी.

वेंगुर्ले न.प. निवडणुकीत भाजपाने प्रचारात घेतली आघाडी.

*कोंकण एक्सप्रेस*

*वेंगुर्ले न.प. निवडणुकीत भाजपाने प्रचारात घेतली आघाडी….*

*प्रभाग क्रमांक ३ मध्ये भव्य रॅली काढून केला घरोघरी प्रचार*

*वेंगुर्ले : प्रतिनिधी*

वेंगुर्ले नगरपरिषद निवडणुकीत भाजपाने प्रचारात आघाडी घेतली आहे. भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिलीप उर्फ राजन गिरप यांच्यासह दोन्ही उमेदवार, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरातील प्रभाग क्रमांक तीन मध्ये भव्य रॅली काढून घरोघरी प्रचार केला. नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या प्रभाग तीन मधील भाजपाचे उमेदवार विनायक उर्फ सुहास गवंडळकर आणि गौरी मराठे या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारात नागरिक ही सहभागी झाले आहेत, घरोघरी जाऊन तिन्ही उमेदवार पक्षाच्या माध्यमातून आपण आजपर्यंत वेंगुर्ले शहरात केलेले काम आणि भविष्यात वेंगुर्ले शहर आदर्श शहर बनवण्यासाठी काय काय करणार आहोत याबाबत ते नागरिकांना माहिती देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!