वेंगुर्ले शहरात पालकमंत्री नितेश राणे यांनी साधला नागरिकांशी सवाद

वेंगुर्ले शहरात पालकमंत्री नितेश राणे यांनी साधला नागरिकांशी सवाद

*कोंकण एक्सप्रेस*

*वेंगुर्ले शहरात पालकमंत्री नितेश राणे यांनी साधला नागरिकांशी सवाद*

*भाजपच्या नगराध्यक्षांसह नगरसेवकांना निवडून देण्याचे केले आवाहन*

*वेंगुर्ले : प्रतिनिधी*

वेंगुर्ले शहरात पालकमंत्री नितेश राणे यांनी भाजप चे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या सह त्या त्या उमेदवारांना घेऊन प्रभाग निहाय नागरिकांशी संवाद साधला. केलेल्या विकास कामांची माहिती देऊन पुन्हा एकदा भाजपच्या विचारांचे नगराध्यक्ष, नगरसेवक निवडून देण्यासाठी त्यांनी आवाहन केले.

नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी वेंगुर्ले मधील प्रभागांमध्ये भेटी दिल्या. भाजपच्या विचारांच सरकार देशात, राज्यात आहे. त्यामुळे शहरात देखील भाजप विचारांची सत्ता आणण्यासाठी भाजपला पाठिंबा द्या आणि भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असं आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केलं. यावेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार दिलीप उर्फ राजन गिरप, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा तालुका अध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब व अन्य पदाधिकारी तसेच त्या त्या भागातील भाजपचे उमेदवार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!