*कोंकण एक्सप्रेस*
*सुधीर आडीवरेकर यांच्या प्रभागात पालकमंत्र्यांची बैठक*
*भाजपला सत्ता देण्यासाठी मतदारांना आव्हान*
*सावंतवाडी: प्रतिनिधी*
नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार युवराज्ञी सौ.श्रद्धा लखम सावंत-भोसले यांच्या प्रचाराला रविवारी प्रचंड वेग आला. सिंधुदुर्गचे पालकमंत्री व महाराष्ट्राचे डॅशिंग नेतृत्व नितेश राणे यांनी स्वतः प्रचाराची धुरा सांभाळत सावंतवाडी शहरात भव्य शक्तिप्रदर्शन केले. त्यांच्या उपस्थितीमुळे भाजपाला शहरवासियांचा मोठा पाठिंबा लाभत असून वातावरण पूर्णपणे भाजपमय झाले आहे.
शहरातील सर्वच भागात महिला, युवक व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. प्रभाग क्रमांक ५ मध्ये भाजपाचे नगरसेवक उमेदवार सुधीर आडिवरेकर, अमित गवंडळकर, मेघा डुबळे, प्रतिक बांदेकर व सुकन्या टोपले यांनी घरोघरी, रस्त्यावर, चौकांमध्ये प्रचारात जोरदार उपस्थिती लावली. विशेष म्हणजे महिलांची उपस्थिती लक्षवेधी होती. महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर यांनी प्रचार मोहीम जोमात राबवली.

युवराज लखम राजे सावंत-भोसले यांच्या उपस्थितीमुळे वातावरणात आणखी रंगत चढली. हायटेक प्रचार साधनांचा वापर, जंगी मांडणी, घोषणाबाजी, सभा यामुळे विरोधकांसाठी ही मोहीम अक्षरशः डोकेदुखी ठरत आहे.
जिल्ह्यातील दिग्गज नेते, नगराध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या प्रमाणात सावंतवाडीत दाखल झाल्याने भाजपाच्या प्रचारयंत्रणेची ताकद शहरवासीयांना प्रत्ययास येत आहे. सौ.श्रद्धा लखम सावंत-भोसले व युवराज लखम सावंत-भोसले यांच्या नेतृत्वाला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून भाजपाची लाट सावंतवाडीत जाणवू लागली आहे.
ही निवडणूक सावंतवाडीतील राजकीय समीकरणे बदलणार अशी चिन्हे दिसत असून भाजपाचा प्रचार दिवसेंदिवस अधिक वेग घेत आहे.

